मध्यप्रदेश बाल संरक्षण आयोगाने दर्शविलेल्या विरोधामुळे धर्मा प्रॉडक्शनच्या ‘गिप्पी’ चित्रपटातील अश्लील शब्द आणि दृश्य हटविण्यात आले आहेत. आयोगाचे सदस्य विभांशू जोशी आणि आर. एच. लता यांनी सांगितले की, निर्माता करण जोहरच्या ‘गिप्पी’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील द्विअर्थी शब्द आणि अश्लील दृश्याची बाब गांभीर्याने घेऊन आम्ही सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि सेंसॉर बॉर्ड यांना पत्र पाठविले होते. परंतु, पत्राचे उत्तर न मिळाल्याने ३० एप्रिल रोजी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव उदय वर्मा यांनी दिल्लीला जाऊन प्रत्यक्ष भेटून चित्रपटाविषयी नाराजी दर्शविली.
६ मे रोजी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने पाठवलेल्या पत्राचा हवाला देत जोशी म्हणाले की, या चित्रपटातून आणि चित्रपटाच्या ट्रेलरमधून द्विअर्थी शब्द आणि एक अश्लील दृश्य हटविले गेले आहे. त्याचप्रमाणे सेंसॉर बोर्डाच्या वेबसाईटवर सुद्धा गिप्पी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सुधारणा केलेल्या दोन्ही बाबींची माहिती देण्यात आली आहे.

Story img Loader