मिस कम्बोडिया- अमेरिकन १९९८, ची ब्युटी क्वीन थो वन्था हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडला असून ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. लॉस ऐंजेलिस येथे राहणारा तिचा पूर्वाश्रमिचा प्रियकर अँजेल मरक्वेझ (३२ वर्षीय) याने वन्थावर गोळ्या झाडून तिच्या राहत्या घरी हत्या केली असा संशय त्याच्यावर घेतला जात आहे.
मित्र परिवाराने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून मरक्वेझ हा थोचा प्रियकर होता. पण तो वन्थाला त्रासच अधिक द्यायचा. जिथे वन्थाचा मृतदेह सापडला तिथेच म्हणजे हर्मोसा बीच येथील घरात ही घटना घडली. या अपार्टमेन्टमध्येच तिच्या प्रियकराचाही मृतदेह सापडला. मरक्वेझच्या मृतदेहा बाजूलाच पिस्तुल सापडले.
वन्था लाँग बीच शाळेत शिकत होती. पहिल्यापासूनच एक मॉडेल आणि अभिनेत्री बनण्याची तिची आकांक्षा होती. १९९८ मध्ये मिस कम्बोडिया अमेरिकाचे विजेतेपदही तिने पटकावले. पण त्यानंतर तिने अभिनेत्री किंवा मॉडेल बनण्यापेक्षा आईप्रमाणे केशभूषाकार बनणे अधिक पसंत केले.
वन्थाचा भाऊ, थो वाऊथी हा एक प्रसिद्ध रॅपर होता. २००३ मध्ये अवघ्या २१ व्या वर्षी मृत्यू झाला. माजी ब्यूटी क्वीनचा जन्म १९८१ मध्ये रेफ्यूजी कॅम्पमध्ये थाय सिमारेषेच्या इथे झाला. ती तीन महिन्यांची असताना तिचे कुटुंब अमेरिकेत येऊन स्थायिक झाले.
