सध्या ‘रांजण’ या आगामी मराठी सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमातली गाणीही अनेकांना भावत आहेत. प्रेम कथेवर आधारित या सिनेमात दोन नवीन चेहरे दिसणार आहेत. दोन नवीन चेहरे असले तरी एक ताकदीचा कलाकारही या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ते म्हणजे विद्याधर जोशी. या सिनेमातून ते पुन्हा एकदा खलनायिकाची भूमिका साकारणार आहे.

विद्याधर जोशी यांच्यासोबतच विनोदाचे हुकमी एक्के भाऊ कदम आणि गणेश भारतपुरेदेखील या सिनेमात दिसणार आहेत. असे हे मराठी सिनेसृष्टीतले तगडे अभिनेते रांजण या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना या खलनायकासोबत विनोदाचे बादशाह असणारे भाऊ कदम आणि भारत गणेशपुरेदेखील दिसणार आहे. हे दोन्ही विनोदी कलाकार पुन्हा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसविण्यास सज्ज झाले आहे. असे हे मराठी चित्रपटसृष्टीचे तगडे तीन कलाकार प्रेक्षकांना रांजण सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा बहुचर्चित ‘रांजण’ हा सिनेमा १७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील ‘लागीर झालं रं’ या गाण्याचा सोशल मीडियात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यश आणि गौरी ही नवी आणि फ्रेश जोडी चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे. या सिनेमातील लागीर झालं रं या गाण्याचा सोशल मीडियात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. अजय गोगावले यांनी त्यांच्या खास शैलीत हे गाणं गायलं आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि गाण्याचं चित्रीकरण या विषयी सोशल मीडियात चर्चा आहे.

‘रांजण’मध्येही एका शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमकथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते. मुलभूत गोष्टींवर भाष्य करते. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यातून व्यक्त होतो. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचे आहे.