भाऊ कदम व अशोक सराफ ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हजर

या चित्रपटात अशोक सराफ यांनी भाऊ कदम यांच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे.

bhau kadam and ashok saraf
भाऊ कदम, अशोक सराफ

झी टॉकीज वाहिनीवर सुरू असलेल्या टॉकीज प्रीमियर लीगमध्ये प्रेक्षकांनी मागील रविवारी तुंबाड, बोला अलख निरंजन आणि हंपी या चित्रपटांचा आस्वाद घेतला. या रविवारी म्हणजेच २६ एप्रिल २०२० रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी झी टॉकीज ओरिजिनल्स घेऊन येत आहे एक हॉरर कॉमेडी चित्रपट… ‘आलटून पालटून’. आलटून पालटून हा एक भन्नाट हॉरर कॉमेडी चित्रपट असून यामध्ये प्रेक्षकांचे लाडके विनोदी अभिनेते अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ व भाऊ कदम यांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळणार आहे.

मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला हॉरर कॉमेडी क्वचितच बघायला मिळते. त्यापैकीच एक असलेल्या आलटून पालटून चित्रपटातून प्रेक्षकांना नक्कीच काही तरी नवीन बघायला मिळेल. अशोक सराफ आणि भाऊ कदम या विनोदवीर जोडीने चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे अशोक सराफ आणि भाऊ कदम ह्या दोन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाला “चार चांद” लावले आहेत असेच म्हणावे लागेल.

आणखी वाचा : कधी सुनेसोबत लंगडी, कधी मुलासोबत दोरीवरच्या उड्या; मिलिंद सोमणची आई नेटकऱ्यांसाठी ठरतेय आदर्श 

आलटून पालटून या चित्रपटात अशोक सराफ यांनी भाऊ कदम यांच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे . चित्रपटाचे कथानक या दोघांच्या भोवती फिरते. हे दोघे भाऊ एका भुताटलेल्या एका घरात राहत असतात जे घर त्यांना एकदम स्वस्तात मिळालेले असते. घरात एक नाही तर ४ -४ भुतं आश्रयाला आहेत हे कळल्यावर दोघा भावांची काय अवस्था होते हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhau kadam and ashok saraf movie during lockdown ssv

ताज्या बातम्या