कोणत्याही कलाकारांच्या वाट्याला त्यांच्या कारकिर्दीत चाहत्यांचे अमाप प्रेम मिळते. चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या यशानंतर किंबहुना चित्रपटाच्या यशापेक्षाही काही कलाकारांना त्यांच्या चाहत्यांचं प्रेम फारच महत्त्वाचं वाटतं. त्यातही काही कलाकारांना त्यांचे असे काही जबरा फॅन भेटतात ज्यांची काहीवेळा कल्पनाही नसते. अशाच एका जबरा फॅनने म्हणजेच अनोख्या चाहत्याने अभिनेता संजय दत्तची भेट घेतली. संजय दत्त सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ‘भूमी’ या चित्रपटाच्या निमित्ताने संजूबाबा सध्या दिल्ली येथे चित्रपटाचे चित्रीकरण करतोय. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान संजूबाबाचा एक चाहता त्याच्या कस्टमाइज्ड बाइकवरुन त्याची भेट घेण्यासाठी आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय दत्त हा स्वत:सुद्धा गाड्यांचा चाहता आहे. त्यामुळे त्याने ज्या क्षणी चाहत्याची ती फॅन्सी बाईक पाहिली त्याक्षणी त्या बाईकवरच संजूबाबाच्या नजरा खिळल्या. त्याने क्षणाचाही विलंब न करता बाईकवर बसत ती बाईक चालवण्याचा आनंद घेतला. संजूबाबाच्या या अंदाजामुळे त्याच्या चाहत्यासाठी हा क्षण फारच आनंद देणारा ठरला असणार यात शंकाच नाही. इतर बाइक्सपेक्षा या चाहत्याची बाइक काहीशी वेगळी होती. बऱ्याच हेडलाइट्स, पुढील चाकावर धातूची एक कवटी अशा पद्धतीने हटके लूक असणारी बाइक अनेकांना ‘घोस्ट रायडर’ या चित्रपटातील आकर्षक बाइकचीही आठवण करुन देणारी ठरु शकते.


वाचा: रेखाच्या भांगातील कुंकू संजय दत्तच्या नावाचे?

दरम्यान, संजय दत्त सध्या ‘भूमी’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये परतण्यास सज्ज झाला आहे. वडील आणि मुलीच्या नातेसंबंधांवर हा चित्रपट भाष्य करणार आहे. या चित्रपटात अदिती राव हैदरी ही संजयच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. ‘भूमी’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी यापूर्वी प्रियांका चोप्रासोबत ‘मेरी कोम’ आणि ऐश्वर्या रायसोबत ‘सरबजीत’ हे चित्रपट केले होते. या दोन्ही चित्रपटांना चांगले यश मिळाले होते. त्यामुळे आगामी चित्रपटातून संजूबाबालाही अपेक्षा आहेत असेच म्हणावे लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhoomi star sanjay dutt rides a fans fancy bike
First published on: 06-03-2017 at 18:33 IST