बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर देशभरातील करोना रुग्णांच्या मदतीसाठी अथक प्रयत्न करत आहे. तिने ‘कोविड वॉरिअर’ हा सोशल मीडिया उपक्रमही सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ती लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी सोशल मीडियाच्या ताकदीचा वापर करत आहे. आपल्या देशबांधवांचे प्राण वाचवण्यासाठी भारतीय कसे एकत्र आले आहेत याबद्दल भूमीला अभिमान वाटतो.

भूमी म्हणते, “या संकटाने आपल्याला एकत्र आणले आहे. आपण दु:खात एकत्र असतो, आपण ज्यांना ओळखतही नाही अशांसाठी प्रार्थना करताना आपण एकत्र येतो, आपण प्राण वाचवण्यासाठी एकत्र आलो आपण मानवतेसाठी एकत्र आलो. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे, इतरांची मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानते. एक नागरिक म्हणून मला अभिमान वाटतो की इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपण सर्व भारतीय कसे एकत्र आलो आहोत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi (@bhumipednekar)

भूमी करोना रुग्णांची मदत करण्यासाठी अथक प्रयत्न करतेय आणि शक्य तितक्या गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी तिने सोशल मीडियाचा वापर केला आहे. तिच्या या उपक्रमामुळे अनेकांना मदत झाली आहे.

पुढे ती म्हणते, “कोविड वॉरिअरने सोशल मीडियाच्या ताकदीचा वापर व्यापक हेतूसाठी केला. एका समान शत्रूसोबत लढणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी या डिजिटल ताकदीचा वापर झाला. या संकट काळात लोकांनी एकमेकांप्रती दाखवलेले प्रेम, काळजी याने मी भारावून गेले. मला कल्पना आहे की या विषाणूवर मात करण्यासाठी आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.”