छोट्या पडद्यावरील बिग बॉस हा शो खासकरुन यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. यंदा बिग बॉसच्या पर्वात सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक त्यांच्यातील वाद आणि टास्क खेळण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत राहिला आहे. यामध्येच आता कश्मिरा शाह आणि निक्की तांबोळी या दोघी चर्चेत आल्या आहेत. या दोघींमधील वाद आता विकोपाला गेला असून कश्मिराने नक्कीला चक्क धमकी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर निक्की आणि कश्मिरा यांच्या भांडणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कश्मिराने निक्कीला धमकी दिली आहे. “जर शांत बसली नाहीस तर थोबाड फोडेन”, असं कश्मिरा निक्कीला म्हणताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या दोघींच्या भांडणामध्ये कश्मिरा निक्कीचं ऐकून घेण्यास तयार नव्हती त्यामुळे निक्कीने कश्मिराला उद्देशून डिस्पिरेट’ असा शब्द वापरला. निक्कीच्या या शब्दावर कश्मिरा संतापली आणि “जर शांत बसली नाहीस तर थोबाड फोडेन”, असं म्हणाली.

दरम्यान, कश्मिराच्या या धमकीवर निक्कीनेदेखील तिला प्रत्युत्तर दिलं आहे. “माझ्याशी या शब्दात बोलू नकोस, नाही तर मीदेखील तुझं थोबाड फोडेन”, असं निक्की म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss 14 kashmira shah and nikki tamboli abusing video viral ssj
First published on: 16-12-2020 at 10:09 IST