बिग बॉस १० चे स्पर्धक ओम स्वामीने या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच घरातल्या सदस्यांना हैराण करुन सोडले आहे. सलमान खानने सतत समजावूनही ओम स्वामींनी काही सुधारण्याचे नाव घेतले नाही. आता तर त्यांनी असे काही केले आहे की त्यामुळे बिग बॉसने त्यांना घराच्या बाहेरचाच रस्ता दाखवला. त्याचे झाले असे की कर्णधार पदाच्या टास्कसाठी ओम स्वामी आणि बानी यांना आपआपले पिरॅमिड बनवायचे होते. घरातले अधिकतर सदस्य हे बानीलाच सहकार्य करत होते.

या टास्कमध्येच असताना इतर सदस्य आणि बानी हे स्वामी ओम यांनी बनवलेला तो पिरॅमीड तोडून टाकले. हे बघून स्वामींना फार राग आला आणि प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी त्यांनी एका भांड्यात लघवी केली. एवढेच करुन ते थांबत नाहीत तर त्यांनी ती लघवी बानी आणि रोहन यांच्या अंगावरही फेकली.

बानीने रागात स्वामींना धक्का दिला आणि रोहनचाही हात त्यांच्यावर उचलला जातो. पण तरीही रोहनने स्वतःवर संयम दाखवले. घरातले इतर सदस्यही स्वामींच्या या हरकतीमुळे त्रस्त झाले आणि त्यांच्या विरोधात बिग बॉसने ठोस पाऊल उचलण्याची विनंतीही केली होती. त्यानंतर बिग बॉसने ओम स्वामींना लगेच घरातून बाहेर काढले होते.

याआधी प्रियंका जग्गा हिलाही घरातून अशाच पद्धतीने बाहेर काढण्यात आले होते. बिग बॉसच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले होते की, सलमानने एका स्पर्धकाला घरातून बाहेर काढले होते. प्रियांकाने सरळ सलमानशीच पंगा घेतल्यामुळे सलमानसोबत ती उद्धटपणाने वागताना दिसत होती. त्यामुळेच तिली बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले होते.

स्वामी ओम यांनी खुद्द बिग बॉसलाच आता धमकी दिली होती. जर त्यांना या पर्वाचे विजेते बनवले नाही तर त्यांचे समर्थक बिग बॉसला सोडणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, जर महाअंतिम फेरीत जर त्यांचे नाव घेतले गेले नाही तर ते आपली युनियन घेऊन येतील.