‘कलर्स’ टीव्ही वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’चे १० वे पर्व लवकरच सुरु होणार आहे. यावर्षीही सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. १६ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता या वादग्रस्त रिअॅलिटी शोचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. पण ‘बिग बॉस’ १० मध्ये नेमकी कोणते कलाकार सहभागी होणार आहेत हे तुम्हाला माहित आहे का? यावेळी बिग बॉसमध्ये सर्वसामान्य जनताही दिसणार आहे. पण नेमके हे सदस्य कोण आहेत याची ओळख आतापर्यंत झाली नव्हती. यातील काही सदस्यांची माहिती देणारा एक प्रोमो ट्विटरवर शेअर केला आहे. यात नेमकी कशाप्रकारचे स्पर्धक सहभागी होणार याची थोडीशी कल्पनाही येते. पहिल्या प्रोमोमध्ये एक काश्मिरी मुलगी दिसते. ती स्वप्नाळू आणि आस्तिक आहे असे तिचे म्हणणे आहे. या प्रोमोमध्ये सेलिब्रिटींना या मुलीपासून सावध राहण्याचे संकेत दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये साधूही या शोमध्ये एक स्पर्धक म्हणून येणार असल्याचे दिसते. या दोघांशिवाय एक गावी राहणारा माणूसही दिसणार आहे. यावेळचे हे बिग बॉसचे पर्व नक्की कसे असणार याबद्दल तर्क लावले जात आहेत. पण हे प्रोमो पाहून तरी सेलिब्रिटींसाठी या लोकांबरोबर राहणे थोडे कठिणच पडणार आहे. या रिअॅलिटी शोच्या पहिल्या भागात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनही दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 10 contestants list common man videos came out in promo
First published on: 09-10-2016 at 19:45 IST