बिग बॉस सिझन ११ मध्ये आता कुठे घर शांत होत आहे असे वाटत असताना एक नवा वाद सुरू झाला आहे. बिग बॉस जेव्हा कोणताही टास्क देतो तेव्हा घरात नवीन वादाला सुरूवात होते. नेमकी हीच बिग बॉस या शोची खासियत आहे. आताही काहीसे हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुनीश, लव आणि विकास यांच्यात एक टास्क होतो. या टास्कमध्ये हे तिघंही डायनोसोर होतात. तर घरातील इतर स्पर्धक त्यांची देखभाल करणारे दाखवण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या टास्कमध्ये लव हा हिनाला, पुनीश हा बंदगीला आणि विकास हा अर्शीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहे. जो हा टास्क जिंकेल त्याची जोडीदार घराची कॅप्टन होणार असते. त्यामुळे तिघेही जीव तोडून हा टास्क जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. सुरूवातीला पुनीश पुढे जाऊन बेनाफ्शाचे पोस्टर फाडतो, ज्यामुळे ती पुढच्या आठवड्यात घरची कॅप्टन होऊ शकत नाही. त्यानंतरही तोच चपळाईने पुढे जाऊन सपनाचा चेहरा असलेले पोस्टर पायाने तोडून टाकतो.

दोनदा उघडलेल्या दरवाजाचा फायदा उठवत पुनीश दोन्ही दावेदारांचे आव्हान नष्ट करतो. यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा विकास आणि लव यांच्यात आत शिरण्यासाठी धडपड होते. याआधी विकासने हिनाचे पोस्टर फाडून तिचीही कॅप्टनसीसाठीची दावेदारी नष्ट केली होती. म्हणून आता लवला पुढे जाऊन अर्शीचे पोस्टर फाडायचे असते. लव दार उघडण्याचा खूप प्रयत्न करतो पण विकास त्याला ते दार उघडू देत नाही.

यादरम्यान, दोघांमध्ये एवढी भांडणं होतात की घरातील इतर स्पर्धकांना मध्यस्थीची भूमिका घ्यावी लागते. पण तरीही विकास आणि लव यापैकी कोणीही ऐकायला तयार नसते. पण खूप वेळ दार घट्ट पकडल्यामुळे आकाशचा हात दुखू लागल्यामुळे तो दार सोडून देतो आणि लव दार उघडून पलिकडे निघून जातो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 11 contestent vikas gupta and luv tyagi gets violent in luxury budget task
First published on: 17-11-2017 at 16:29 IST