छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. बॉलिवूडचा भाईजान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १४वे पर्व सध्या चर्चेत आहे. नुकताच वीकेंडचा वार भागामध्ये सलमानने स्पर्धकांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता सोमवारी पार पडणाऱ्या भागामध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मोनालिसा बिग बॉसच्या स्पर्धकांची भेट घेणार आहे. दरम्यान राहुल महाजन, अली गोणी, एजाज खान यांनी पोल डान्स केल्याचे पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच कलर्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मोनालिसा रेड आउटफिटमध्ये घरात एण्ट्री करते आणि पोल डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर ती घरातील इतर सदस्यांना देखील पोल डान्स करण्यास सांगते. तेव्हा राहुल महाजन, रुबीना दिलैक, राखी सावंत, एजाज खान, अली गोणी हे स्पर्धक पोल डान्स करताना दिसतात.

राहुल महाजन आणि एजाज एका टीममध्ये असतात. ते दोघेही एकत्र पोल डान्स करताना दिसत आहेत. सध्या त्या दोघांचा पोल डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याच भागामध्ये बिग बॉसच्या घरातील एका स्पर्धकाला घर सोडावे लागणार आहे.

बिग बॉसच्या आगामी भागात मोनालिसा शिवाय आणखी काही कलाकार हजेरी लावणार आहेत. नागिन ५ मालिकेतील अभिनेत्री सुरभि चंदन, शरद मल्होत्रा, बॅरिस्टर बाबू मालिकेतील काही कलाकार देखील हजेरी लावणार असल्याचे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 14 rahul mahajan poll dance avb
First published on: 04-01-2021 at 16:31 IST