अभिनेत्री शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापट ‘बिग बॉस ओटीटी’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आलेली जोडी आहे. आता हिच जोडी सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला शो ‘बिग बॉस १५’मध्ये पुन्हा दिसत आहे. पण आता राकेश बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. प्रकृती खालावल्यामुळे राकेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी राकेशची ‘बिग बॉस १५’च्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. त्याला पाहून शमिता शेट्टीला आनंद झाला होता. तिने राकेशला मिठी मारली होती. ईटाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरला रात्री अचानक राकेशला वेदना असह्य होऊ लागल्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी किडनी स्टोनमुळे वेदना होत असल्याचे सांगितले. तसेच राकेश लवकर बरा होऊन पुन्हा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
PHOTOS: ‘तारक मेहता…’मधील बबिताने खरेदी केले नवे घर, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या राकेशवर मुंबईतील रुग्णालयात उपाचर सुरु आहेत. तो पुन्हा शोमध्ये कधी दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी राकेशने गोरिलाचा ड्रेस परिधान करुन बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली होती. त्याला पाहून शमिताला आश्चर्य वाटले होते. राकेशसोबतच बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धक नेहा भसीनने एण्ट्री केली आहे.