बिग बॉस या रिअॅलिटी शोने प्रसिद्धीस आलेला अभिनेता एजाज खान याला मुंबई पोलिसांनी अटक केले होते. एजाजवर अश्लील फोटो, संदेश आणि छेडछाड केल्याचे आरोप लावण्यात आले होते. पण, त्यानंतर त्याला दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. बुटीक चालविणा-या ऐश्वर्या चौबेने एजाजवर अश्लील फोटो आणि संदेश पाठवल्याचा आरोप केला होता. मूळची काश्मिरची असलेली ऐश्वर्या ही सलमानची चाहती असल्याचे सांगते. मात्र, एजाजने या आरोपांचे खंडण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याविरुद्ध षडयंत्र केले जात असल्याचे एजाजने म्हटले आहे. तो म्हणाला की, मुंबई-पुणे येथे माझे अनेक शत्रू निर्माण झाले आहेत. तेच हे सर्व काही करत असल्याचे त्याने म्हटले. पण, त्याने कोणात्याही व्यक्तिचे नाव घेतले नाही. ऐश्वर्याने वर्सोवा पोलीस ठाण्यात एजाज विरोधात तक्रार दाखल केली होती. ती म्हणाली की, एक दिवस एजाजने मला जुहू येथील हॉटेलमध्ये बोलवण्याचा प्रयत्न केला होता. त्यादरम्यान त्याने मला अश्लील संदेशही पाठवले.

कोण आहे एजाज खान?
एजाज हा बिग बॉसनंतर चर्चेत आला होता. या शोदरम्यान आपल्या सह स्पर्धकाला मारहाण केल्याच्या आरोपाअंतर्गत त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले होते. त्याने काही हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame ajaz khan arrested for sending obscene pictures to woman
First published on: 21-11-2016 at 12:34 IST