‘बिग बॉस मराठी २’मध्ये सध्या सवाल ऐरणीचा हा टास्क रंगतो आहे. ज्यामध्ये घराबाहेर जाण्यासाठी प्रत्येक टीममधून एक सदस्याचे नाव बिग बॉस घेत आहे. ज्या सदस्याचे नाव घेतले जाईल त्या सदस्याने संदेश पत्रात असलेल्या सदस्याला लिहिलेली गोष्ट करण्यास पटवायचे आहे. या सवाल ऐरणीचा टास्कमध्ये शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे या दोघींनी अनुक्रमे अभिजीत बिचुकले आणि वैशाली म्हाडे यांना संदेश पत्रात दिलेली गोष्ट करण्यास पटवायचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिजीत बिचुकले यांचा वाद घरातील बहुतेक सदस्यांबरोबर आहे तर पहिल्या दिवसापासून शिवानी सुर्वेसोबत असलेला वाद सगळ्यांनाच माहिती आहे. यानंतर अभिजीत बिचुकले शिवानी सुर्वेला नॉमिनेशन मधून वाचविण्यास तयार होतील का, तर नेहा शितोळेला वाचविण्यासाठी वैशाली म्हाडे तयार होईल का हे पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे.

याच टास्कदरम्यान अभिजीत केळकर आणि रुपाली भोसले भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सवाल ऐरणीचा या टास्कमध्ये वीणा जगताप आणि मैथिली जावकर यांच्यासाठी अनुक्रमे अभिजीत आणि रुपाली यांना बिग बॉसने सांगितलेल्या गोष्टी नष्ट करायच्या आहेत. अभिजीत केळकरला त्याच्या मुलांचे आणि कुटुंबाचे फोटो तर रुपालीला तिच्या भावाने दिलेला टेडी नष्ट करायची आहे. आता अभिजीत आणि रुपाली या गोष्टी नष्ट करून विणा आणि मैथिलीला वाचवू शकतील का, या सवाल ऐरणीचा टास्कमध्ये नक्की काय होईल हे येत्या भागात स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 2 abhijeet kelkar and rupali bhosale got emotional
First published on: 29-05-2019 at 18:04 IST