‘बिग बॉस मराठी 2’च्‍या घरामध्‍ये पहिली एन्ट्री झाली ती 80चं दशक गाजवलेल्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांची. त्यांच्या दिमाखदार एन्ट्रीने सीझनची सुरुवात तर धमाल झालीच पण घरातल्या त्यांच्या वावरातून आणि खेळातून सिझनची रंगत पण तितकीच वाढत आहे. बिग बॉसच्या घरात किशोरी शहाणेंच्या फिटनेसचीही चर्चा आहे. अनेकदा त्या गार्डनमध्ये योगा करताना दिसतात. बिग बॉस मराठीच्या एका ‘अनसीन अनदेखा’च्‍या नवीन क्लिपमध्‍ये त्या दिगंबर नाईक आणि अभिजीत बिचुकले यांना प्राणायाम शिकवताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळच्या वेळेस दिगंबर व बिचुकले गार्डन एरियामध्‍ये बसून गप्‍पा मारताना दिसतात आणि तेवढ्यात त्‍यांना किशोरी त्यांची नियमित योगासने करताना दिसतात. यावर दिगंबर त्यांना हाक मारतो आणि म्‍हणतो, ”बाहेर सोडायचं ना ते..?” आपल्या योगासनांबद्दल असं बोलल्यावर किशोरी शहाणे त्याचे फायदे सांगितल्याशिवाय राहतील तर नवलच. किशोरी लगेचच त्‍याच्‍याजवळ बसून त्‍याला योगासनांची पद्धत व सूचना सांगण्‍याचा प्रयत्‍न करताना दिसतात आणि शिकवताना म्हणतात, ”श्‍वास बाहेर सोडायचा असतो, करूया का?”

वाचा : सलमानने फेडले ‘राइझिंग स्टार ३’ विजेत्याच्या वडिलांचे कर्ज 

किशोरी यांनी पटवून दिसेल्या योगासनाचे फायदे बहुदा दिगंबरला पटले, त्यामुळे त्याने लगेच ते करायला सुरुवात केलेली दिसते. किशोरीसोबत दिगंबर योगा करताना दिसतो खरा पण पहिल्‍यांदा दिगंबरला सराव करताना अस्‍वस्‍थ वाटते. तो किशोरीला त्‍याची पत्‍नी कशाप्रकारे योगा करते हे देखील सांगतो पण त्‍याला त्‍याची फारशी आवड नसल्‍याचे सुद्धा सांगतो. पण अखेर तो किशोरी यांच्यासाठी योगासन करण्‍याचे मान्‍य करतो. योगासन करत असताना किशोरी बिचुकलेंना सुद्धा त्‍यांच्‍यासोबत सामील होण्‍यास सांगतात आणि म्‍हणतात, ”हे तुम्‍ही करू शकता, पाय दुखत असतील तरी.” झोपाळ्यावर निवांत झोके घेत असलेले बिचुकले सुद्धा लगेच उठतात आणि त्यांच्या सुचनांचे पालन करताना दिसतात. अखेर बिचुकले आणि दिगंबर या दोघांना पटवून योगासनं करायला लावण्यात किशोरी यशस्वी ठरल्या. असंच या फिटनेस क्रांतीमध्ये इतर कोणाचा समावेश होतो का ते पहावं लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 2 new fitness coach in the house
First published on: 11-06-2019 at 18:42 IST