Bigg Boss Marathi 2 : शिवानी देणार का अभिजीतला घरकामाचे धडा ?

शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचुकले मध्ये लहान लहान गोष्टींवरुन वाद होताना दिसतात

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी २’ च्या घरात सध्या काही सदस्यांमध्ये वाद होतायेत,तर काही सदस्यांची मात्र चांगली मैत्री झाली आहे. त्यातच माधव देवचक्के आणि अभिजीत बिचुकले या दोघांमध्ये अशीच मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मात्र अभिजीत आणि शिवानी यांच्यामध्ये कायम वाद होतानाच दिसत आहेत. त्यामुळे आता शिवानी एक डाव आखत असून यामध्ये ती अभिजीतला धडा शिकवणार आहे.

घरामध्ये अनेक वेळा शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचुकले मध्ये लहान लहान गोष्टींवरुन वाद होताना दिसतात. कॅप्टनपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर शिवने घरातील अन्य कामांची जबाबदारी घरातील सदस्यांवर सोपवली आहे. यासाठी त्याने काही टीमही तयार केल्या आहेत. यापैकी शिवानी आणि अभिजीत एका टीममध्ये आले आहेत. मात्र अभिजीत अनेक वेळा घरातील काही ठराविक कामे करण्यास नकार देतात. यावरुनच शिवानी आणि अभिजीतमध्ये वाद होतात.

बिचुकले यांना घरच्या कामाची फारशी सवय नाही आणि त्यांना ते जमत देखील नाही याचा अंदाज शिवानीला आला आहे. त्यामुळे मी या कामातून माघार घेईन असं शिवानीने बिचुकलेंना सांगितलं. मात्र तिच्या या वक्तव्यांची बिचुकल्यांनी खिल्ली उडवली. यावर संतापलेल्या शिवानीने शिवला ‘मी जेवण करणाऱ्यांच्या टीममध्ये जाईन’, असं सांगितलं. त्यानंतर मी जेवणाच्या टीममध्ये गेल्यानंतर घरात कोण झाडू मारतं हा प्रश्न शिवानीला पडला आहे. बिग बॉसच्या घरात आलं की प्रत्येक कामामध्ये सदस्यांना मदत करावी लागते आणि आता शिवानी बिचुकले यांना झाडू कशी मारायचा हे शिकवणार का ? हे बघणे गंमतीशीर असणार आहे. याआधी तिने बिचुकलेंना त्यांचे कपडे आणि जागा कशी साफ ठेवावी हे शिकवले होते. तेव्हा नक्की बघा ही गंमत आजच्या बिग बॉस मराठी सिझन २ च्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bigg boss marathi 2 shivani surve and abhijit bichukle punishment ssj

ताज्या बातम्या