छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ सध्या ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सिझनमध्ये कलाकारांव्यतिरिक्त किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील देखील सहभागी झाल्या आहेत. नुकताच बिग बॉसच्या घरात ‘नाव मोठे लक्षण खोटे’ हे नॉमिनेशन कार्य पार पडले. या नॉमिनेशमध्ये घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर नॉमिनेट करायचे होते. नॉमिनेट झालेल्या सदस्यांना वाटू शकते की त्यांचे योगदान अधिक आहे आणि याचसाठी त्या सदस्यांना व्यक्त होण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. त्यावेळी शिवलीला यांनी ‘बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे’ असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॉमिनेशन टास्कमध्ये नॉमिनेट झालेल्या सदस्यांना वाटू शकते की त्यांचे योगदान अधिक आहे आणि याचसाठी त्या सदस्यांना व्यक्त होण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. तसेच सुरक्षित सदस्यांपैकी कोणता सदस्य नॉमिनेट व्हायला हवा होता हे कारणांसहीत सांगायचे आहे असे जाहीर केले. याच कार्यामध्ये स्नेहा आणि मीनल मध्ये भांडण झाले. आज जय, विकास आणि शिवलीला त्यांची मते मांडताना दिसणार आहेत.

आणखी वाचा : ‘तुला स्वत:च्या बुद्धीचा वापर करताच येत नाही का?’, तृप्ती देसाई आणि शिवलीलामध्ये जुंपली
जय म्हणाला, “सोनाली मी तुझं नाव घेईन, तू खूप स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी आहेस. तू मला खेळात मात देशील आणि म्हणून मी तुला घाबरतो. मी मस्ती नाही करत आहे मी खरं बोलतो आहे. मी तुला एक स्पर्धक म्हणून घाबरतो असं मी तुला तोंडावर सांगतो. तर या प्रक्रियेत विकासने स्नेहाचे नावं घेतले.
 
शिवलीला पाटील म्हणाल्या, “मला मान्य आहेत सगळ्या गोष्टी. मला गेम कळायला थोडा वेळ लागला. पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग दिसेल. बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे, इथे फक्त काड्या, कुचर्‍या एवढचं केलं जातं असं प्रत्येक जण म्हणतं. पण मी असा विचार करून आले होते, की जेव्हा इथे येईन ना तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठ दिवस जरी राहिले ना तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन ना त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 3 is a fighting show said by shivlila avb
First published on: 28-09-2021 at 14:48 IST