अभिनेत्री स्मिता गोंदकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली असून आता फक्त मेघा धाडे आणि पुष्कर जोग घरात राहिले आहेत. टॉप ३ पर्यंत स्मिता पोहोचली. तिघांपैकी एकाने बझर दाबून सहा लाख चाळीस हजारची रक्कम घेऊन घरी जाऊ शकतात असं महेश मांजरेकर यांनी विचारलं होतं. मात्र मेघा, पुष्कर आणि स्मिता यापैकी कोणीच हा पर्याय स्विकारला नाही. त्यामुळे तिघांपैकी स्मिताला कमी मतं पडल्याने तिला घराबाहेर जावं लागलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रँड फिनालेमध्ये पोहोचलेल्या सहा स्पर्धकांपैकी स्मिता ही सरप्राइज विजेती ठरू शकते असं अनेकांचं मत होतं. ती सुरुवातीपासूनच प्रामाणिकपणे हा खेळ खेळली आणि कधीच कोणत्या वादात अडकली नाही. त्यामुळे तिचा प्रामाणिक खेळ जिंकण्यासाठी कारणाभूत ठरणार असल्याचं समजलं जातं होतं. मात्र मेघा आणि पुष्करच्या तुलनेत तिला कमी मतं पडल्याने घरातून बाहेर पडावं लागलं.

 

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi grand finale smita gondkar gets evicted
First published on: 22-07-2018 at 22:39 IST