बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या सर्वात जास्त चर्चा रंगतेय ती म्हणजे केव्हीआर अर्थात किशोरी, वीणा आणि रुपाली यांच्या गृपची. दुसऱ्या पर्वाची सुरुवात झाल्यापासून या तिघींमध्ये चांगली बॉण्डींग निर्माण झाली आहे. घरात मजामस्ती करणं असो किंवा गॉसिपिंग असो या तिघी कायम एकत्र दिसून येत होत्या. मात्र गेल्या काही दिवसापासून या तिघींमध्ये खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कधी काळी दृढ झालेली ही मैत्री आता तुटणार की काय असा संशय साऱ्यांना येत आहे.

बिग बॉसच्या घरातून पराग कान्हेरे गेल्यापासून या तिघींचे एकमेकांसोबत खटके उडत आहेत. वीकएण्डच्या डावामध्येही या तिघींनी एकमेकींवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे या तिघींच्या मनात नक्की काय सुरु आहे हेच कोणाला समजत नाहीये. परंतु त्यांच्या एकंदरीत वागण्यावरुन आता यापुढे होणारे सगळे टास्क या तिघी स्वतंत्रपणे खेळणार असल्याचं दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, घरामध्ये आता वीणाची शिवसोबत चांगली मैत्री झाली आहे. त्यामुळे घरात अनेक वेळा त्यांना चिडवलंही जातं. त्यातच आता शिवमुळे या तिघांच्या मैत्रीमध्ये फूट पडली आहे.