Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’त सध्या वादग्रस्त ठरलेला ‘द ग्रेट डिक्टेटर’ हे कार्य सुरू आहे. ज्यामध्ये नंदकिशोर हुकूमशहा आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहेत. नंदकिशोरने प्रजेला दिलेल्या टास्क आणि शिक्षेवरून त्याच्यावर बरीच टीका होत आहे. स्मिता आणि आस्ताद हुकुमशहा नंदकिशोरचे रक्षक आहेत. टास्कदरम्यान नंदकिशोरने प्रजेला गौरवगीत तसेच जयघोष तयार करायला सांगितले. आजदेखील बिग बॉस मराठीच्या घरात ‘द ग्रेट डिक्टेटर’ हे कार्य रंगणार आहे. परंतु काल मेघाला बिग बॉस कडून मिळालेल्या आदेशानुसार आज प्रजा हुकूमशहा विरोधात बंड पुकारणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉसने हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी प्रजेला काही टास्क दिले. कारण, जेव्हा प्रजा बंड करते तेव्हा हुकूमशाही संपुष्टात येते. टास्कनुसार प्रजेने हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकूमशहाचा पुतळा नष्ट करणे, हुकूमशहाच्या डोक्यावर पाणी ओतणे, हुकुमशहाच्या विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणे या गोष्टी करणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये आज बिग बॉस मराठीच्या घरात नंदकिशोर म्हणजेच हुकुमशहाच्या घरामध्ये लागलेल्या पोस्टरवर काळा रंग फासताना आस्ताद मेघाला पकडणार आहे. तसेच मेघाकडे असलेली शाई देखील हुकूमशहाचे रक्षक जप्त करणार आहेत. त्यामुळे आता हा टास्क कसा पूर्ण होईल? तसेच मेघा आणि शर्मिष्ठाला आज शिक्षादेखील होणार आहे ज्यावरून प्रजा आणि हुकूमशहा तसेच त्यांचे रक्षक यांच्यामध्ये बरेच वाद होताना दिसणार आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण प्रजा एकत्र येऊन बंड पुकारणार आहे.

Big Boss Marathi: महेश मांजरेकरांनाही वाटली ‘हुकूमशहा’ची लाज

सई आणि रेशम मिळून कसा पुतळा नष्ट करतील, स्मोक बॉम्ब कसा फोडतील, सई डोक्यावर पाणी ओतण्यामध्ये यशस्वी होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi nandkishor dictator task mahesh manjrekar
First published on: 21-06-2018 at 14:22 IST