Bigg Boss Marathi : आधी बिकीनी आता वॅक्सिंग, पुष्करचं नेमकं चाललंय तरी काय?

आपल्या आगळ्यावेगळ्या कृत्याची चर्चा व्हावी आणि बातमी व्हावी यासाठी प्रत्येक स्पर्धक युक्त्या लढवतोय.

bigg boss marathi
'बिग बॉस मराठी'

‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो आता त्यातील टास्कमुळे चर्चेत येऊ लागला आहे. हुकूमशहाच्या टास्कवरून आधी नंदकिशोर ट्रोल झाला आणि त्यानंतर आता ‘होऊ दे चर्चा’ हा टास्क सध्या बिग बॉसच्या घरात रंगतोय. आपल्या आगळ्यावेगळ्या कृत्याची चर्चा व्हावी आणि बातमी व्हावी यासाठी प्रत्येक स्पर्धक युक्त्या लढवतोय. आपली बातमी व्हावी यासाठी पुष्कर जोग चक्क बिकीनीत वावरला आणि त्यानंतर तो वॅक्सिंगसुद्धा करणार आहे.

सदस्यांना बिग बॉस मराठीच्या घरात येऊन आता ७० दिवस झाले आहेत. विविध गोष्टी विचारात घेऊन सदस्यांना स्वत:ची क्रमवारी ठरवायची होती. यानुसार रेशम पहिल्या क्रमांकावर आणि मेघा, पुष्कर, सई अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर उभे राहिले. बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना जरा हटके असे ‘होउ दे चर्चा’ हे साप्ताहिक कार्य सोपवले. ज्यामध्ये आस्ताद मंगळावर पोहोचला तर पुष्करने बिकिनी घातली. आऊ आणि शर्मिष्ठाने मोठे भांडण झाल्याचे दाखवले. यानुसार मेघा आणि रेशमने पुष्कर आणि आस्तादला सर्वांत जास्त ब्रेकिंग न्यूज दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर पुष्कर रिपोर्टर आणि आस्ताद कॅमेरामॅन झाला. या टास्कमध्ये आज कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : शाहरुखने इरफानला मदत केलीच नव्हती; लंडनमधल्या घराची किल्ली दिल्याच्या चर्चा खोट्या

आज ‘होऊ दे चर्चा’ या टास्कमध्ये सई, स्मिता, नंदकिशोर, पुष्कर हे ब्रेकिंग न्यूज देण्याचा प्रयत्न करणार आहेत. सईचे फोटो कोणीतरी लपवले असल्याने ती आस्ताद, स्मिता यांना विचारणार आहे. ज्यावरून सई आणि स्मितामध्ये खूप भांडण होणार आहे. तसेच सई नंदकिशोरच्या डोक्यावर पीठ टाकणार आहे तर मेघा नंदकिशोरच्या डोक्यावर अंड फोडणार आहे.

पुष्कर जोग या टास्कसाठी वॅक्सिंग करणार आहे. ‘होउ दे चर्चा’ या साप्ताहिक कार्यामध्ये जो जास्तीत जास्तीत ब्रेकिंग न्यूज देणार आहे त्या सदस्यांना या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारी कोण मिळवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bigg boss marathi pushkar jog will do waxing for a task