कपड्यांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरणारी बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद सध्या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या चर्चा उर्फीने तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगविषयी खुलासा केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. उर्फीने मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही असे म्हटले आहे. तसेच तिने त्यामागचे कारण देखील सांगितले आहे.

उर्फीने नुकताच इंडिया टूडेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये लग्नाविषयी बोलताना ती म्हणाली की, ‘मी एक मुस्लिम मुलगी आहे. माझ्या प्रत्येक पोस्टवर घाणेरड्या कमेंट करणारे हे अर्धे मुस्लिम लोक असतात. त्यांना असे वाटते की मी इस्लामची प्रतिमा मलिन करत आहे. त्यांना माझा प्रचंड राग येतो कारण मुस्लिम पुरुषांना त्यांच्या घरातील महिलांनी एका विशिष्ट प्रकारे व्यवहार करावा, असे वाटते. ते समाजातील सर्व महिलांना नियंत्रित करु इच्छितात. त्यामुळे मी इस्लामला मानत नाही.’
आणखी वाचा : श्वेता बच्चन नंदाच्या वैवाहिक जीवनात वादळ? पतीला सोडून आई-वडिलांसोबतच का राहते बिग बींची मुलगी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, ‘मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. मी इस्लाम किंवा इतर कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. त्यामुळे मी कोणाच्याही प्रेमात पडू शकते. मला ज्या व्यक्तीशी लग्न करायचे त्याच्याशी मी लग्न करेन.’ सध्या उर्फी भगवद् गीता वाचत आहे. याविषयी बोलताना ती म्हणाली, ‘मी सध्या भगवद् गीता वाचत आहे. मी फक्त त्या (हिंदू) धर्माविषयी जाणून घेऊ इच्छिते.’