‘बिग बॉस ११’ ची स्पर्धक अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यातील वाद एवढा वाढला आहे की, शिल्पा त्याला सर्वांसमोर शिवीगाळ देताना दिसते. तर विकासही जसेच्या तसे उत्तर देण्यासाठी तिला रात्री झोपू न देण्याच्या शकला लढवताना दिसतो. पण या सगळ्यात मजेशीर गोष्ट अशीही आहे की, विकास गरज पडेल तेव्हा तिची मदतही करत असतो. नुकतेच ‘बिग बॉस’च्या घरी असे काही झाले की त्यातून विकास तिला अनेकदा मदत करतो हे सिद्ध झाले.
Big Boss 11- शिल्पा-विकासमधील भांडण मारामारीपर्यंत
यावेळी ‘बिग बॉस’ने पाठवलेल्या लक्झरी टास्कची माहिती वाचून दाखवण्याची वेळ शिल्पावर आली. यावेळचे टास्क हिना, आर्शी आणि पुनीश यांच्यात खेळले गेले. हिनापासून या टास्कची सुरुवात होणार होती. या टास्कशी निगडीत पत्र शिल्पाला वाचून दाखवायला सांगितले तेव्हा तिला ते पत्र नीट वाचता येत नव्हते. ती प्रत्येक शब्द फार काळजीपूर्वक वाचत होती.
BB Farm mein murgi ka ho raha hai peecha aur contestants kar rahe hai tote se shikayat! Watch it all tonight 10.30pm on Colors! #BB11 pic.twitter.com/fM9JPNHeuF
— ColorsTV (@ColorsTV) October 5, 2017
शिल्पाने काही वाक्य वाचल्यानंतर ‘बाड’ या शब्दावर ती अडखळली. खूप प्रयत्न केल्यानंतरही तिला हा शब्द नीट वाचता येईना, तेव्हा विकासने तिच्या जवळ जाऊन तिला योग्य शब्द काय आहे ते सांगितले. यानंतर शिल्पाने उर्वरीत संदेश पूर्ण वाचून दाखवला. एवढेच नाही तर इंग्रजीमधील ‘गाईड’ या शब्दाचा उच्चार तिने ‘ग्लुड’ असा केला. यानंतर बेनाफ्शाने जेव्हा हे पत्र पुन्हा वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिल्पाने तिला वाचू दिले नाही आणि दोघींमध्ये बाचाबाची झाली.