अभिनेत्री बिपाशा बासू गेल्या काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. बिपाशा सतत सोशल मीडियावर फोटो शेअर करुन तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे चाहत्यांना सांगत असते. नुकताच बिपाशाने तिचे जुने फोटो शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिपाशाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या पहिल्या बिकिनी शूटचा फोटो शेअर केला आहे. हे फोटोशूट बिपाशाने कॉलेजमध्ये असताना केले आहे. या लूकमध्ये बिपाशा अत्यंत वेगळ्या अंदाज दिसत आहे. या फोटोमध्ये बिपाशा सावळी दिसत असली तरी बॉलिवूडमधील हॉट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिच्या लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

चाहत्यांना बिपाशाचा हा लूक आवडला असून चाहत्यांनी बिपाशावर कमेंटचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांना तर बिपाशाला पून्हा या लूकमध्ये पाहायचे असल्याचे म्हटले आहे. बिपाशा २०१५मध्ये ‘अलोन’ या चित्रपटामध्ये दिसली होती. दरम्यान ती करण सिंग ग्रोवरच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिने करणसह लग्न केले. तेव्हा पासून बिपाशा रुपेरी पडद्यापासून लांब असल्याचे दिसत आहे. आता बिपाशा पुन्हा केव्हा चित्रपटात दिसणार याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bipasha basu share first bikini photo avb
First published on: 25-07-2019 at 14:37 IST