बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आज ५४ वा वाढदिवस. आमिरने वयाच्या आठव्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. नसीम हुसैन यांच्या ‘यादों की बारात’ या चित्रपटामध्ये आमिर बालकलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर त्याचा बॉलिवूड प्रवास सुरु झाला. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटासाठी त्याला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. वर्षाकाठी केवळ एकच ब्लॉकबस्टर चित्रपट करणारा आमिर चित्रपटाच्या निवडीबाबत बराच चोखंदळ आहे. त्यामुळेच त्याला मि. परफेक्शनिस्ट म्हटलं जातं. मात्र यशाचं उच्च शिखर गाठणाऱ्या या अभिनेत्याने कधीकाळी चित्रपटाचं प्रमोशनसाठी स्वत: बस, टॅक्सीमध्ये जाऊन पोस्टर चिटकवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारवारीत नेणारा आमिर आज ‘जिनियस’, ‘परफेक्टशनिस्ट’, ‘मूव्हरिक’, ‘मि.ब्लॉकबस्टर’ म्हणून ओळखला जातो. मात्र बॉलिवूडमध्ये प्रवास करत असताना त्याला अनेक खाचखळग्यांचा समाना करावा लागला होता. १९८८ साली प्रदर्शित झालेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिरने स्वत: चित्रपटाचे पोस्टर बस आणि रिक्षामध्ये जाऊन चिटकवले होते.

‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट तयार करताना चित्रपटाच्या टीमला अनेक अडचणी आल्या होत्या. त्यातच हा चित्रपट लो बजेटचा होता. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खान आणि चित्रपटाचे निर्माते स्वत: रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे पोस्टर चिटकवत असताना आमिर अनेक वेळा मी या चित्रपटाचा हिरो आहे असं नागरिकांना सांगत होता. त्यामुळे हा चित्रपट आमिरसाठी कायम लक्षात राहण्यासारखा आहे, असं म्हटलं जातं.

बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या आमिरला प्रत्यक्षात एक लॉन टेनिस प्लेयर व्हायचं होतं. लहानपणापासून आपल्याला टेनिस प्लेयर व्हायचं आहे हे स्वप्न त्याने उराशी बाळगलं होतं. मात्र त्यानंतर त्याच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday special about aamir khan that will take your breath away
First published on: 14-03-2019 at 11:51 IST