मुंबई महानगरपालिकामध्ये होत असलेल्या भ्रष्ट्राचाराबद्दल तक्रार केल्यांनंतर चार दिवसानंतर आता महानगरपालिकेने कपिल शर्माच्या विरोधात बेकायदा बांधकाम केल्याबद्दल तक्रार नोंदवली आहे. महानगरपालिकेचे उप- अभियंता एडी जगताप यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम कायद्यानुसार तक्रार नोंदवली आहे. मुंबई पोलीसचे प्रवक्ता डीसीपी दुधे यांनी सांगितले की, कपिल ओशिवरा येथील डीएचएल एनक्लेवमध्ये नवव्या मजल्यावर राहतो. तर इरफान खान पाचव्या मजल्यावर राहतो.
हे सगळे प्रकरण तेव्हा सुरु झाले जेव्हा कपिलने नरेंद्र मोदी यांना त्याच्याकडे लाच मागितल्याचे ट्विट केले. कपिलच्या या ट्विटनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला योग्य ती मदत करण्यात येईल असे ट्विट केले. यानंतर महानगरपालिकेने कपिलच्या या घटनेशी निगडीत महानगरपालिका अधिकाऱ्यांची नावे त्याच्याकडे मागितली. तसेच त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करण्याचा आरोपही केला होता. कपिल विरोधात जारी करण्यात आलेल्या नोटिसमध्ये हे सगळे लिहिण्यात आले आहे. कपिलच्या या प्रकरणामुळे इरफान खानही महानगरपालिकेच्या नजरेत आले आहेत. या घटनेत जर हे दोघंही दोषी ठरले गेले तर त्यांना दोन हजार ते पाच हजार रुपयांचा दंड आणि एक महिना ते तीन वर्षांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
कपिल शर्माने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांना टॅग केल्यामुळे त्याच्यावर टिकेची झोड उठवली होती. सोशल मीडियावर त्याच्या विरोधात अनेकांनी आपला राग व्यक्त केला होता. १५ कोटी रुपयांचा आयकर भरुनही मला माझ्या नवीन कार्यालयासाठी बीएमसीला ५ लाख रुपयांची लाच द्यावी लागत आहे अशा प्रकारचे ट्विट कपिल शर्माने केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Tonight #arijitsingh On #thekapilsharmashow 😎

A photo posted by Kapil Sharma (@kapilsharma) on

#thekapilsharmashow #TKSS

A photo posted by Kapil Sharma (@kapilsharma) on

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc files case against kapil sharma and actor irrfan khan over unauthorized construction
First published on: 13-09-2016 at 20:16 IST