बॉबी डार्लिंग आणि तिचा नवरा रमणीक शर्मा यांच्यातील वाद दिवसागणिक वाढतच चालला आहे. दोघंही एकमेकांवर आरोप करत आहेत. नेमकं कोण खरं बोलतय हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. बॉबीच्या मते रमणीक तिला मारहाण करायचा आणि तिच्या सर्व संपत्तीवर त्याचा डोळा होता. तर, बॉबी ज्या संपत्तीला स्वतःची संपत्ती सांगते ती मुळात तिची संपत्ती नाही, असं रमणीकच म्हणण आहे. या प्रकरणात आता रमणीकची आई राजकुमारी शर्मा यांनीदेखील उडी घेतली आहे. राजकुमारी यांनी बॉबीसंदर्भात अनेक खुलासे केले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ‘बॉबी मुलगी नसून एक पहिलवान आहे. तिने लिंग बदल केला असला तरी तिच्या वागणुकीत काहीही बदल झालेला नाही.’

तर सासूने आपल्याला फार त्रास दिल्याचा आरोप बॉबीने केला आहे. यावर राजकुमार म्हणाल्या की, ‘मला चालायला त्रास होतो. असं असताना मी बॉबीला कसा त्रास देईन. याउलट तिनेच आमच्या कुटुंबाला फार त्रास दिला आहे. ती आम्हाला शिवीगाळ करायची. कुटुंब काय असतं हेच तिला माहित नाही. तिला फक्त ग्लॅमर आवडतं. ती लिंग बदल करुन प्रसिद्धीच्या झोतात राहू इच्छिते.’  ‘रमणीक आपल्या आईलाही मारायचा. तो पट्टा, चप्पल आणि हातांनी आईला मारायचा. नातेवाईकांमध्ये रमणीक आधीपासूनच बदनाम आहे. मला राजकुमारी यांच्यावर फार दया येते.’ असं बॉबीच म्हणण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉबी डार्लिंगने गेल्या वर्षी भोपाळमधील व्यावसायिक रमणीक शर्मासोबत लग्न केले होते. लग्नानंतर तिने आपले नाव बदलून पाखी शर्मा केले होते. रमणीक आणि बॉबी ऑक्टोबर २०१५ मध्ये फेसबुकवर भेटले होते. सध्या बॉबी आणि रमणीकचा त्यांच्या भोपाळ आणि मुंबईमधील फ्लॅटवरुन वाद सुरू आहे. दोघंही या फ्लॅटवर आपला हक्क सांगत आहेत. माझ्यावर खोटे आरोप करुन मला तुरुंगात टाकण्याचा बॉबीचा कट आहे, असे रमणीकचे म्हणणे आहे. बॉबीने रमणीक विरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार केली असून, पोलिसांनी रमणीकला १२ सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.