‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणाऱ्या अभिनेता आमिर खान याने नुकताच त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा केला. चित्रीकरणाच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत त्याने प्रसारमाध्यमं आणि चाहत्यांच्या साथीने हा खास दिवस साजरा केला. या निमित्ताने आमिरने एका पत्रकार परिषदेचंही आयोजन केलं होतं. ज्यामध्ये त्याला पत्नी किरण राव हिचीही साथ लाभली होती.

माध्यमांच्या विविध प्रश्नंची उत्तरं देणाऱ्या आमिरने केक कापत या खास दिवस साजरा केला. यावेळी त्याला पत्नी किरणकडून एक खास गिफ्ट मिळालं. केक कापून झाल्यावर तो एकमेकांना भरवल्यानंतर काही क्षणांसाठी आमिर आणि किरणच्या प्रेमाचे सुरेख क्षण पाहण्याची संधी सर्वांनाच मिळाली. माध्यमं, छायाचित्रकार या कशाचीही तमा न बाळगता या दोघांनीही एकमेकांना किस केल्याचं पाहायला मिळालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरण आणि आमिरचे हे खास क्षण पाहता त्याचं बर्थडे सेलिब्रेशन खऱ्या अर्थाने खास होतं, असंच म्हणावं लागेल. आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने आमिर गेल्या काही दिवसांपासून जोधपूरमध्ये होता. मात्र, कुटुंबियांसोबतच आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून तो मुंबईत परतला. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओच्याच माध्यमातून त्याने ही गोष्ट स्पष्ट केली. वाढदिवसाच्या निमित्तामे आमिरने इन्स्टाग्रामवर एका नव्या प्रवासाची सुरुवात केली असून, पहिली पोस्टही केली आहे. ज्यामाध्यमातून त्याने आईचा फोटो पोस्ट करत आपल्या वाट्याला आलेलं यश आणि सध्याच्या घडीला आयुष्यात आपण ज्या टप्प्यावर आहोत या साऱ्याचं श्रेयं आईला दिल्याचं पाहायला मिळालं.

वाचा : इन्स्टाग्राम पोस्टमधून प्रिया वारियरची जबरदस्त कमाई

https://twitter.com/aamir_khan/status/973857730082390016