अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची अनेकांचीच इच्छा असते. पण, चित्रपटात अमिताभ बच्चन साकारात असलेल्या व्यक्तिरेखेची लहानपणीची भूमिका रुपेरी पडद्यावर वठविण्याची संधी मिळाली तर, ही संधी मिळाली होती एका बालकलाकाराला. अमिताभ बच्चन यांच्या अनेक जुन्या चित्रपटांमधील या बालकलाकाराचा चेहरा अनेकांच्या ओळखीचा आहे. या कलाकाराचं नाव आहे मयूर राज वर्मा. त्याकाळी तो ‘मास्टर मयूर’ नावाने प्रसिध्द होता. सध्याच्या घडीला तो चित्रपटांमधून फारसा दिसत नसला तरीही त्याचा उल्लेख मात्र आवर्जून केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मयुर सध्या व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असून, या क्षेत्रात त्याचा पक्का जम बसला आहे. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी मयूरने जवळपास १५ चित्रपट आणि ९ मालिकांमध्ये काम केलं. एक काळ असा होता की बॉलिवूडमध्ये काही प्रसिद्ध बालकलाकारांमध्ये त्याचं नाव घेतलं जायचं. ७०-८० च्या दशकात त्याने बऱ्याच चित्रपटांमध्ये बिग बींचं बालपण साकारलं होतं. शरीरयष्ठी, चेहरेपट्टी अमिताभ यांच्यासारखीच असल्यामुळे त्यांना ‘यंग अमिताभ बच्चन’ म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं होतं. मयूरच्या नावाला खऱ्या अर्थाने ओळख दिली ती ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटाने. या चित्रपटातील त्याची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर त्याला इतर चित्रपटांच्या ऑफर आल्या. किंबहुना त्या काळात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बालकलाकारांमध्ये मयूरचा समावेश होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor amitabh bachchan birthday special child role played by artist then and now mayur raj verma
First published on: 11-10-2017 at 14:11 IST