बॉलिवूड कलाकारांचं रुपेरी पडद्यावरचं आयुष्य जितकं रंजक असतं तितकच त्यांचं खासगी आयुष्यसुद्धा रंजक असल्याचं पाहायला मिळालं आहे. नातेसंबंध, अफेअर्स, मुलं या कारणांमुळे बऱ्याच सेलिब्रिटींची नावं प्रकाशझोतात आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशाच एका अभिनेत्याचं नाव म्हणजे धर्मेंद्र. सध्याच्या घडीला धर्मेंद्र इशा- अहाना आणि बॉबी- सनी यांचे वडील म्हणूनही ओळखले जातात. पण, याच अभिनेत्याला आणखी दोन मुलीसुद्धा आहेत, हे फार कमीजणांना ठाऊक आहे. त्यांच्या या मुलींचे म्हणजेच अजिता आणि विजेताचे सध्याचे फोटोसुद्धा कुठेच उपलब्ध नाहीत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक फोटो धर्मेंद्र यांच्या मुलींचाच असल्याचं म्हटलं जात होतं, पण त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

अजिता आणि विजेता यांचं बॉबी, सनीसोबत एक खास नातं आहे. त्यांच्या भावा- बहिणीच्या प्रेमाबद्दल सांगावं तितकं कमीच. कलाविश्वातील कुटुंब आणि या क्षेत्राचा कुटुंबातील सदस्यांवर असणारा पगडा अजिता- विजेतावर पाहायला मिळाला नाही. त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पणाचा विचारही केला नव्हता असं म्हटलं जातं. या झगमगाटाच्या विश्वापासून नेहमीच दूर राहणाऱ्या धर्मेंद्र यांच्या या दोन मुली कौटुंबिक समारंभातही फार कमीच दिसतात. काही वेबसाइट्सवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार या दोघीजणी कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजिताने किरण चौधरीसोबत लग्न केलं असून ती सध्या सुखी आयुष्य जगत आहे.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
ग्रामविकासाची कहाणी

वाचा : चित्रपटांच्या सेटवरच जुळल्या या सेलिब्रिटींच्या रेशीमगाठी

dharmendra-9

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

तर, विजेताच्या नावाने खुद्द धर्मेंद्र यांनी प्रोडक्शन हाऊस सुरु केलं. त्यांच्या कंपनीचं नाव ‘विजेता प्रोडक्शन प्रा. लि.’, असं आहे. विजेता सध्या अमेरिकेतच स्थायिक झाली आहे. पण, धर्मेंद्रच्या या मुलींची सहसा अनेकांना आठवणही होत नाही. धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी पहिला विवाह केला होता. पण, पहिल्या पत्नीपासून घटस्फोट न घेताच त्यांनी धर्म बदलून अभिनेत्री हेमा मालिनीसोबत लग्न केलं. हिंदू कुटुंबात जन्मलेले अभिनेते धर्मेंद्र यांनी १९७९ साली इस्लाम धर्म स्वीकारला होता. गेल्या ५७ वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीशी जोडले गेले आहेत.