सारा अली खान आणि हर्षवर्धन कपूर हे सेलिब्रिटी किड्स गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी अचानकच या दोघांचीही डिनर डेट व्हायरल झाली होती. तेव्हापासूनच त्यांच्यावर छायाचित्रकारांचाही डोळा होता. सैफ अली खानची मुलगी सारा आणि झक्कास अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातही सध्या सोशल मीडियावर गाजणारे फोटो पाहता त्यांच्या विषयी सुरु असणाऱ्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे.
हर्षवर्धन कपूर साराच्या घराबाहेर पडतानाचे फोटो सध्या चर्चेत आले आहेत. या फोटोमध्ये तो साराच्या घराकडून परतताना दिसत आहे. मुख्य म्हणजे छायाचित्रकारांनी त्याचे फोटो घेण्यास सुरुवात केली तेव्हा हर्षवर्धनचा राग त्याच्या चेहऱ्यातून व्यक्त झाल्याचंही पाहायला मिळालं. हर्षवर्धन कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणातही व्यस्त आहे. पण, त्यासोबतच शक्य त्या वेळी तो सारासोबतही काही क्षण घालवताना करत आहे. तर सारासुद्धा तिच्या बॉलिवूड पदार्पणावर लक्ष केंद्रित करत आहे.
वाचा: जान्हवीसोबतच्या अफेअरमुळे शाहिदने भावाला खडसावलं?
करिअरच्या सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये या सेलिब्रिटी किड्सची अशा प्रकारची चर्चा त्यांच्या बॉलिवूड करिअरवर काय परिणाम करणार हे सांगणं कठीण आहे. पण, त्यांच्या या नात्याला नेमकं काय नाव द्यायचं हासुद्धा एक प्रश्नच आहे. दरम्यान, सारा आणि हर्षवर्धन कपूर यांना अनेकदा एकत्र फिरताना पाहण्यात आलं आहे. पण, आता या दोघांमध्ये तिसरीची एण्ट्री झाल्याचंही म्हटलं जातंय. हर्षवर्धनचं नाव एलेना फर्नांडिस या हॉट मॉडेलसोबत जोडलं जात आहे.