गेल्या वर्षी अनेक घडामोडी घडून गेल्या त्यामुळे २०२० हे वर्ष विसरणं कोणालाही शक्य नाही. मात्र, यावर्षातील कटू आठवणी वसरून प्रत्येकाने नव्या उत्साहात आणि आनंदात २०२१ या नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे. त्याचसोबत काहींनी नवे संकल्पदेखील केले आहेत. या अभिनेता हृतिक रोशननेदेखील असाच एक नवा संकल्प केला असून त्यादृष्टीने त्याने वाटचाल सुरु केली आहे.

नव्या वर्षात हृतिकने ड्रोन शिकण्याचा संकल्प केला आहे. याविषयीचा एक व्हिडीओदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याच्या या नव्या कलेची चर्चा रंगली आहे.


हृतिकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो त्याच्या २ मित्रांसोबत ड्रोन उडवताना दिसत आहे. नव्या कौशल्यासह नवीन वर्षात प्रवेश, असं कॅप्शन हृतिकने या व्हिडीओला दिलं आहे. विशेष म्हणजे त्याचा हा व्हिडीओ लोकप्रिय ठरत आहे.

दरम्यान, हृतिक सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. लवकरच तो विक्रम वेधा या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट एका तामिळ चित्रपटाचा रिमेक असून यात त्याच्यासोबत अभिनेता सैफ अली खान स्क्रीन शेअर करणार आहे.