खासगी क्षेत्रातील येस बँकेची स्थिती सध्या चांगली नाही. त्यातच रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या पैसे काढण्यावरही निर्बंध घातले आहे. येस बँकेच्या सद्यस्थितीवर सर्वच स्तरातील लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बॉलिवूड कलाकारांनीही बँकेच्या स्थितीवर आपली मतं व्यक्त केली आहेत. परंतु बँकेच्या या स्थितीला अभिनेता अर्जुन कपूर जबाबदार असल्याचा खोचक टोला कमाल खान यानं लगावला आहे. २ स्टेट या चित्रपटात अर्जुन कपूर येस बँकेचा कर्मचारी असल्याचं दाखवण्यात आला होता. कमाल खानचं हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमाल खाननं येस बँकेच्या सद्यस्थितीवरून अर्जुन कपूरला टोला लगावला आहे. “अर्जुन कपूरनं आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे ते सर्व चित्रपट बुडाले आहेत. २ स्टेट हा त्याचा एकमेव चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटात तो येस बँकेचा कर्मचारी दाखवण्यात आला होता. आता तर येस बँकचं बुडाली,” अशा आशयाचं ट्विट कमाल खाननं केलं आहे. त्याचं हे ट्विट काही वेळातचं मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.

रिझर्व्ह बँकेने गुरूवारी येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार ग्राहकांना बँकेतून ५० हजार रूपयांची रक्कम काढता येणार आहे. येस बँकेच्या या स्थितीचा अनेकांना मोठा फटका बसला आहे. तर रिझव्‍‌र्ह बँकेने ‘येस’ बँकेवर निर्बंध घातल्याने या बँकेत ठेवी ठेवणाऱ्या राज्यातील १०९ बँका अडचणीत आल्या असून त्यात विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह काही नागरी बँका व काही पत संस्थांचाही समावेश आहे. या बँकांचे सर्व ‘ऑनलाईन’ व्यवहार ठप्प झाले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor kamal khan criticize arjun kapoor yes bank issue jud
First published on: 10-03-2020 at 10:10 IST