गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आला आहे. २३ वर्षीय अंकिता कोनवारसोबत रिलेशनशिपमध्ये असणारा मिलिंद नव्या वर्षात तिच्यासोबत लग्नही करणार असल्याच्या चर्चा आहेत. याच सर्व वातावरणात अंकिता आणि मिलिंदवर पुन्हा एकदा अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. त्यामागचे कारण म्हणजे, सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला एक व्हिडिओ.
मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या प्रेयसीच्या साथीने सर्वांनाच ‘फिटनेस गोल्स’ दिले आहेत. प्रेम आणि शारीरिक सुदृढता या गोष्टींचा सुरेख मेळ साधत मिलिंदने पुशअप्स मारतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. मुख्य म्हणजे या व्हिडिओमध्ये पुशअप्स मारताना त्याच्या पाठीवर अंकीता बसल्याचे दिसते. असे असतानाही हा ‘आयर्न मॅन’ अगदी सहज पुशअप्स मारताना दिसतो. मात्र, २० पुशअप्स मारण्याचा मानस असतानाही आपण फक्त ४ पुशअप्सवरच थांबल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आला आहे.
मिलिंदच्या खासगी आयुष्यामुळे तो यापूर्वीही चर्चेत आला होता. पण, अंकितासोबतच्या नात्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलं. ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मिलिंदने काही दिवसांपूर्वीच अंकिताच्या कुटुंबियांची भेट घेतली असल्याचे म्हटले जातेय. त्यामुळेच येत्या काळात ते दोघंही विवाहबंधनात अडकणार असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.
वाचा : ‘जब वी मेट・मधील गीतचा प्रियकर आठवतोय…