बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून काही अभिनेत्यांची नावं घेतली जातात. त्यातीलच एक नाव म्हणजे रणबीर कपूर. ‘चॉकलेट बॉय’, ‘सावरिया’, ‘रॉकस्टार’ अशा विविध नावांनी रणबीर ओळखला जातो. चित्रपटांप्रमाणेच त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठीसुद्धा अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळते. विविध अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले असतानाही रणबीरने बऱ्याचदा तो सिंगल असल्याचे स्पष्ट केले. पण, आता मात्र तो लग्नाचा विचार करत असल्याचे कळते आहे. रणबीरची आई नीतू कपूर त्याच्या लग्नासाठी आग्रही असून, आता त्याने आयुष्यात स्थिरस्थावर व्हावे अशीच त्यांची इच्छा आहे.

काही दिवसांपूर्वीच रणबीर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये दिसला होता. कोणाचीही तमा न बाळगता न्यूयॉर्कमध्ये भटकणाऱ्या या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या रिलेशनशिपविषयी बरेच तर्कही लावले गेले. त्यामुळे या सर्व चर्चांपासून दूर जात निदान आतातरी आपल्या मुलाने लग्नाचा विचार करावा, असे त्याच्या आईला वाटत असल्याची चर्चा आहे. त्या उद्देशानेच त्यांनी रणबीरसाठी सुयोग्य मुलीची शोधाशोधही सुरु केली असल्याचं ऐकायला मिळत आहे. रणबीर मात्र या साऱ्यापासून चार हात लांब असून, आगामी चित्रपटांवरच तो लक्ष केंद्रित करत आहे.

वाचा : पिसाळलेल्या कुत्र्यांना मारायलाच पाहिजे: शरद पोंक्षे

रणबीरचे खासगी आयुष्य बऱ्याचदा प्रकाशझोतात आले असून, अभिनेत्री कतरिना कैफसोबत तो लिव्हइन रिलेशनशिपमध्येही होता. पण, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्यामुळे आता ‘मम्माज बॉय’ रणबीर आईचे सांगणे मनावर घेत लग्न करण्यासाठी तयार होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.