महिनाभर रोजाचे उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधवांसाठी पर्वणी असणाऱ्या रमजान ईदचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. फक्त मुस्लिम बांधवच नाही तर, विविध धर्मीय जनसमुदायातसुद्धा या सणाविषयी प्रचंड कुतूहल पाहायला मिळतं. तीन दिवस साजरा होणाऱ्या या उत्सवामध्ये मिठी ईद आणि छोटी ईदही साजरी केली आहे.

चंद्राचं दर्शन झाल्यानंतर गळाभेट करत ईदच्या शुभेच्छा देत या सणाची सुरुवात होते. अशा या सणाच्या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. भाईजान सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान ईदचं सेलिब्रेशन कसं करतात याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. किंबहुना सलमानच्या घराबाहेर या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने गर्दी करतात. पण, तुम्हाला माहितीये, सलमानच्या घरी नेमकं कोणत्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो?

Nagpur, Wildlife Transit Treatment Center, India s First Wildlife Transit Treatment Center, Wildlife Transit Treatment Center Nagpur, wild life, wild animals, forest department, forest officers,
वन्यप्राण्यांच्या पिल्लांना ‘येथे’ मिळणार मायेची ऊब, भारतातील पहिले स्वतंत्र “पेडियाट्रिक सेंटर”
uran friends of nature foundation marathi news
उरण: कोरड्या पाणवठ्यात वन्यजीवांसाठी पाणी भरण्याचा उपक्रम
how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद

‘पिंकव्हिला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सलमानच्या वडिलांनी म्हणजेच सलीम खान यांनी यासंबंधीचा उलगडा केला आहे. ‘माझ्यासाठी ईदचा दिवस इतर दिवसांप्रमाणेच असतो. त्या दिवशी काही खास सेलिब्रेशन वगैरे आम्ही करत नाही. खरंतर झाले गेले रागरुसवे विसरुन आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत त्याच आपुलकीने नातं पुढे नेण हा ईद साजरी करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. माझ्यासाठी आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ईद, दिवाळी किंवा होळी हे सर्व सण महत्त्वाचे आहेत’, असं सलीम खान म्हणाले.

वाचा : आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता

आम्ही रोजा सोडताना आणि ईदच्या निमित्ताने खास प्रकारची मिठाई आणि खास प्रकारची मिठाईसुद्धा बनवतो, असंसुद्धा त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितलं. ‘काही वर्षांपूर्वी ईद साजरी करताना फार उत्साही वातावरण असायचं. आता मात्र ईद म्हटलं की पाहुण्यांची ये- जा आणि पक्वानांचा बेत अशी आखणी करत ईद साजरी केली जाते’, असं सलीम खान म्हणाले.

वाचा : सलमान आणि सहअभिनेत्रींच्या वयात होतं इतकं अंतर!

सलमानच्या घरी ईद साजरी करण्याची पद्धत ही इतरांप्रमाणेच असली तरीही भाईजान मात्र हा सण त्याच्या चाहत्यांसोबत सेलिब्रेट करतो. ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करत सलमान अनोख्या मार्गाने चाहत्यांना ईदी देत त्यांच्या आनंदात सहभागी होतो. यंदा त्याचा ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटात सलमान ‘लक्ष्मण सिंग बिश्त’च्या भूमिकेत दिसतो.