चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला लोकप्रियता येते. अर्थात लोकप्रियतेचं प्रमाण कमी- जास्त असलं तरीही प्रेक्षकांच्या प्रेमापासून मात्र कलाकार मंडळी दूर राहात नाहीत. अशाच काही कलाकारांच्या यादीत एक नाव अग्रस्थानी आहे. ते म्हणजे अभिनेता शाहरुख खानचं. बऱ्याच वर्षांपासून शाहरुखला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्याला भेटणारा प्रत्येक ‘फॅन’ हा वेगळा आणि कायमचा स्मरणात राहणारा आहे. अशाच एका चाहतीला भेटण्याची संधी किंग खानला नुकतीच मिळाली. त्याची ही चाहतीसुद्धा बरीच लोकप्रिय असून, तिच्या अदांनी अनेकांचीच मनं जिंकली आहेत. त्या अभिनेत्रीचं नाव आहे नतालिया वोडायनोव्हा. Natalia Vodianova

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकत्याच पार पडलेल्या ‘वोग’ पुरस्कार सोहळ्यामध्ये हॉलिवूड अभिनेत्री नतालियाला शाहरुखला भेटण्याची संधी मिळाली. अनेकांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता आपल्याला भेटल्याचा आनंद नतालियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्यक्त केला. इतकंच काय, तर खूप आधीपासून आपल्याला तो खूप जास्त आवडत असल्याचंही तिने कबुल केलं.

त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये नतालियाने लिहिलं, “काल रात्री मला माझ्या ‘क्रश’ला, बॉलिवूडच्या ‘किंग’ला भेटण्याची संधी मिळाली. ‘कुछ कुछ होता है’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’ या त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्यावरील प्रेमामुळे मी भारताबद्दलची स्वप्न पाहू लागले होते. आज त्याची प्रत्यक्षात भेट घेतल्याचा आणि त्याला ‘वोग एण्टरटेनर ऑफ द इयर’ हा पुरस्कार दिल्याचा मला फार आनंद होत आहे.’ नतालियाने या कॅप्शनमध्ये शाहरुखच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचीही प्रशंसा केली. त्यासोबतच त्याचे मनापासून आभारही मानले.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

आपल्या या अनोख्या ‘सेलिब्रिटी चाहती’ला भेटल्यानंतर किंग खानलाही फार आनंद झाला असणार यात शंकाच नाही. तारे-तारकांची मांदियाळी असणाऱ्या ‘वोग’ पुरस्कार सोहळ्यात अनपेक्षितपणे अशा एका चाहतीची भेट होणं ही बाब कोणत्याही कलाकारासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यातही नतालिया वोडायनोव्हा ही आपल्या चित्रपटांच्या आणि आपल्या प्रेमात होती याचा खुद्द शाहरुखनेही विचार केला नसावा. त्यामुळे हेसुद्धा त्याच्यासाठी एक सरप्राईजच होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor shah rukh khan was a big time crush of hollywood actress natalia vodianova vogue awards
First published on: 25-09-2017 at 19:13 IST