अभिनेता शाहरुख खानच्या कुटुंबाविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली असते. त्यातही शाहरुखची मुलगी सुहाना गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. किंग खानच्या लाडक्या मुलीचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाहरुखच्या पत्नीने म्हणजेच गौरी खानने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सुहानाचा सुरेख फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्य म्हणजे सुहानाचा हा १७ वा वाढदिवस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाची १६ वर्षे पूर्ण करुन सुहाना आता सतराव्या वर्षांत पदार्पण करत आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ सुरु होत असल्यामुळे आपल्या मुलीच्या पुढच्या वाटचालीसाठी गौरीने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सुहाना सध्या शिक्षणाच्या निमित्ताने लंडनमध्ये आहे. त्यामुळे तिथेच तिचा वाढदिवस साजरा केला जाणार असल्याचं म्हटलं जातंय. गौरीने सुहानाचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सुहाना सुरेख दिसत असून, तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज पाहायला मिळते आहे.

किंग खानच्या लाडक्या लेकीचे हे फोटो पाहता येत्या काळात तीसुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते, असाच अंदाज वर्तवला जात आहे. कॅमेरासमोर इतक्या सहजतेनं सुहानाचा वावर तिच्या बॉलिवूड पदार्पणाचेच संकेत देत आहे. गौरीने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये प्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकरचे आभार मानले आहेतच. त्यासोबतच तिने निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचेही आभार मानले आहेत. करण आणि शाहरुखचा घरोबा सर्वांनाच ठाऊक आहे. पण, या फोटोशूटसाठी त्याचे आभार मानण्यामागचं कारण काही वेगळेच संकेत देत आहे, असं म्हणायला हरकत नाही.

बॉलिवूडमध्ये सतत नवे चेहरे लॉन्च करणारा करण येत्या काळात सुहानाला त्याच्या चित्रपटांमध्ये संधी देतो का, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, वाढदिवसाचा आनंद घेणारी सुहाना सध्यातरी तिच्या शिक्षणावरच लक्ष केंद्रित करत असून, तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor shah rukh khans daughter suhana turns 17 as mummy gauri khan shares a gorgeous photo of birthday girl
First published on: 22-05-2017 at 12:09 IST