यंदाच्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये बॉलिवूडची विशेष छाप पाहायला मिळाली. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोण आणि सोनम कपूरने या दिमाखदार सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती. या बॉलिवूड सुंदरींमध्ये सर्वांच्याच नजरा खिळल्या त्या म्हणजे ऐश्वर्या राय बच्चनवर. ऐश्वर्या आणि कान फिल्म फेस्टिव्हल हे नातं काही नवीन नाही. पण, ती ज्या अंदाजात दरवर्षी ‘कान’ला हजेरी लावते तो अंदाज मात्र पूर्णपणे वेगळा असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाही ती अशाच अनोख्या अंदाजात ‘कान’च्या रेड कार्पेटवर आली आणि सर्वांची मनं जिंकून गेली. ऐश्वर्या यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या मुलीसोबत म्हणजेच आराध्यासोबत गेली होती. त्यामुळे अॅशप्रमाणेच छायाचित्रकारांच्या नजरा आराध्यावरही खिळल्या होत्या. कानमधील आराध्या- अॅशचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतानाच आता आणखी एक फोटो सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधतो आहे. या फोटोमध्ये आराध्या आणि ऐश्वर्या मोठ्या ऐटीत बसल्या असून दोघींच्याही अदा पाहण्याजोग्या आहेत.

हा फोटो पाहताना सर्वात सुंदर कोण, आई की मुलगी? असाच प्रश्न तुमच्याही मनात येईल यात शंकाच नाही. आराध्याला इतक्या लहान वयात प्रसारमाध्यमांसमोर वावरताना असलेली समज पाहता ऐश्वर्याच्याच पावलावर पाऊल ठेवत ती बऱ्याच गोष्टी शिकत असल्याचं लक्षात येत आहे. यंदाच्या कान महोत्सवामध्ये काही प्रसिद्ध चेहऱ्यांसोबतच आराध्यासुद्धा प्रकाशझोतात आली होती. तिला स्टारडमच्या गोष्टी कितपत कळतात? असा प्रश्न विचारला असता ‘आराध्याला आता सगळं कळायला लागलंय. आम्ही काय काम करतो याची तिला कल्पना आहे. आराध्याच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बघून आम्हाला हसू येतं. जेव्हा चाहते माझा फोटो काढायला येतात तेव्हा ती स्वतः आमच्या मधे येऊन फोटो काढण्यासाठी उभी राहते’, असं ऐश्वर्या म्हणाली होती.

वाचा: झहीर आणि सागरिकाच्या साखरपुड्याला ‘विराट-अनुष्का’ दिसले पुन्हा एकत्र

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress aishwarya rai bachchan and her daughter aaradhya poses for a photo look like real life princesses cannes film festival
First published on: 24-05-2017 at 16:33 IST