‘आम्ही दोघंही एकमेकांना वचन देतो की….’, असं म्हणत क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांनीही सात जन्म एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला. इटलीमध्ये मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत हे ‘मोस्ट हॅपनिंग’ कपल विवाहबंधनात अडकलं आणि जणून काही आपल्याच कोणा एका खास मित्राचा, मैत्रिणीचा किंवा कोणा जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा पार पडतो आहे, असं समजत नेटकऱ्यांनी विराट- अनुष्काच्या विवाह सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्न सोहळ्यातील क्षणांचे बरेच व्हिडिओ सध्या चर्चेत असून #virushkaKiShadi असा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला आहे.

मेहंदी पासून ते विराटच्या हळदी समारंभापर्यंत बऱ्याच गोष्टींचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले असून प्रत्येकजण ते व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. अनुष्काच्या ‘बिदाई’चा व्हिडिओसुद्धा अनेकांचेच लक्ष वेधतो आहे. ‘दिन शगना दा चढेया…’ हे गाणे सुरु असतानाच अनुष्काची पाठवणी होत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

वाचा : अबब! विरुष्काचे लग्न झालेल्या रिसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाठवणीच्या वेळी प्रत्येक मुलीच्या मनात ज्याप्रमाणे भावनांचा कोलाहल पाहायला मिळतो अगदी तेच भाव अनुष्काच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. एक कुटुंब सोडून दुसऱ्या कुटुंबाची सदस्य म्हणून नवी सुरुवात करणारी अनुष्का त्यावेळी भावुक झाली होती. अनुष्काला रडताना पाहून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या मित्रमंडळींनी खोडकरपणे रडण्याचे नाटक करुन तो प्रसंग गमतीदार करण्याचा प्रयत्न केला. विराट आणि अनुष्काने त्यांच्या लग्नाच्या बाबतीत बरीच गोपनियता पाळली होती. पण, शेवटच्या काही दिवसांमध्ये ते इटलीला लग्न करणार असल्याचे सर्वांसमोर उघड झाले. ज्या ठिकाणी त्यांचा विवाहसोहळा पार पडला, त्याचे फोटोही शेवटच्या क्षणांमध्ये व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. विरुष्काच्या लग्नाच्याच चर्चांनी इतका जोर धरला होता, की सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांच्याच विवाह सोहळ्याचा प्रभाव पाहायला मिळाला.

https://www.instagram.com/p/BcljgT2F9hF/