गेल्यावर्षी बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झाले. शाहिद कपूर-मीरा राजपूत, करिना कपूर खान-सैफ अली खान, शब्बीर अहलुवालिया-कांची कौर, गीता बसरा-हरभजन सिंग या सेलिब्रिटींच्या घरी गोंडस बाळांनी जन्म घेतला. यावर्षीही अनेक बॉलिवूडकरांच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. नुकतेच मॉडेल अभिनेत्री लिसा हेडनने गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा सोहा अली खान आणि ईशा देओल यांच्याकडे लागल्या आहेत.

अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी

सोहा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असल्यामुळे तिचे नवनवीन फोटो तिच्या चाहत्यांना पाहायला मिळतात. पण ईशाचे मात्र तसे नाही. सिनेसृष्टीपासून दूर झाल्यावर ती फारसी प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. पण नुकताच तिच्या एका मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर तिचा आणि ईशाचा गरोदरपणातला फोटो शेअर केला आहे.

हिवाळ्यामध्ये ईशाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होईल असे म्हटले जात आहे. ईशा प्रसारमाध्यमांपासून दूर असल्यामुळे तिच्या गरोदरपणातल्या या दिवसांपैकी एकही फोटो सोशल मीडियावर आला नव्हता. पण आता हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल हे नक्की. ईशा या फोटोत तिची मैत्रिण आणि शेफ चीनू हिच्यासोबत दिसत आहे. फोटोमध्ये चीनूदेखील प्रेग्नेंट असल्याचे स्पष्ट होते. दोघीही फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. फोटोत ईशाने काळ्या रंगाचा वन पीस आणि क्रीम रंगाचा श्रग घातला आहे.

VIDEO: राणा डग्गुबतीच्या आगामी चित्रपटाचा दमदार टिझर पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईशा ‘रोडीज एक्स-२’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय २०१५ मध्ये आलेल्या ‘किल देम यंग’ सिनेमात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजवली होती. ईशाने २९ जून २०१२ रोजी व्यावसायिक भारत तख्तानी याच्याशी लग्न केले. लहानपणापासून एकमेकांना ओळखणाऱ्या ईशा आणि भारतने वेगवेगळ्या करिअरची निवड केल्यामुळे ते एकमेकांपासून दूर झालेले. पण, ‘टेल मी ओ खुदा’च्या शूटदरम्यान ईशा आणि भारतची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांच्यातील प्रेम बहरले.