आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते कधी काय करतील याचा नेम नसतो. बऱ्याच वेळा सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी चाहते त्यांच्या घराबाहेर गर्दी करत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीच्या चाहत्याने तिला पाहण्यासाठी चक्क पाच दिवस रस्त्यावर काढले आहेत. त्या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही बॉलिवूड अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पूजा हेगडे आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या चाहत्याने नाव भास्कर राव असे आहे. त्याने पूजाची एक झलक पाहण्यासाठी चक्क पाच दिवस तिच्या घराबाहेर घालवले. तो पाच दिवस रस्त्यावर झोपला. पूजाला हे कळताच तिने चाहत्याची भेट घेत माफी मागितली. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूजाने दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या ‘मोहंजदडो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती हृतिक रोशनसह मुख्य भूमिकेत झळकली होती. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. परंतु पूजाचा दाक्षिणात्य चित्रपट ‘महर्षीने’ने अनेकांच्या मनावर राज्य केले. या चित्रपटातून पूजा खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. पूजा लवकरच अभिनेता अल्लू अर्जुनसह ‘AA19’ या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे. बॉलिवूडमधील साजिद नाडियाडवाला निर्मित आणि फरहाद सामजी दिग्दर्शित ‘हाऊसफूल ४’ या चित्रपटात तिने काम केले आहे.