रेड कार्पेटवर जाणं अनेक कलाकारांना आजही बरंच दडपण देऊन जातं. पण ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा मात्र या बाबतीत अपवाद ठरु शकते. फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वातही विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये रेड कार्पेटवरील तिचा वावर डोळे दिपवणारा असतो हे नाकारता येणार नाही. ६९ व्या प्राइमटाइम एमी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवरही तिचा असाच अंदाज पाहायला मिळाला.

‘एमी’चं रेड कार्पेट म्हणजे फॅशन, आत्मविश्वास आणि सेलिब्रिटींच्या नवनवीन लूक्सची सुरेख सांगड. हीच सांगड घालत प्रियांकाने रेड कार्पेटवर ‘एन्ट्री’ घेतली आणि सोशल मीडियावर तिच्या या लूकच्याच चर्चा सुरु झाल्या.

स्लीक हाय पोनीटेल, डार्क मर्साला लिपस्टीक, ‘बालमेन’ या फॅशन ब्रॅण्डचा हायनेक पायघोळ पर्शियन गाऊन असा एकंदर तिचा लूक यावेळी होता. रेड कार्पेटवर प्रवेश करताच अनेकांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. तिथे उपस्थित छायाचित्रकारांनी क्षणाचाही विलंब न लावता तिची एक झलक टिपण्यास सुरुवात केली. तर इथे ट्विटरवरही प्रियांकाच्या लूकविषयीच्या ट्विट्सना उधाण आलं.

‘प्रियांका चोप्राचा लूक लक्षवेधी आहे. त्यामुळे इतरांनी आता घरी जावं’, ‘ती अप्रतिम दिसते…’, ‘व्यासपीठावर चालण्याचा तिचा अंदाज तर पाहा, कोणा एका राणीप्रमाणेच ती येत आहे…’ असे बरेच ट्विट करत ट्विटरवर तिची प्रशंसा करण्यात आली. मुख्य म्हणजे या ट्विटमध्ये काही युजर्सनी ‘क्वांटिको गर्ल’ प्रियांकाच्या ट्विटर हॅन्डलचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे हे सर्व ट्विट पाहून याता खुद्द प्रियांका काय प्रतिक्रिया देईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

https://twitter.com/ofumaofuma/status/909564249667751936

https://twitter.com/RealSmartyRahul/status/909560465851793408