बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. त्यानंतर अवघ्या एक- दोन दिवसांतच रियाच्या लग्नाची बातमी समोर आली. तिने शिवम तिवारीशी एका खासगी सोहळ्यामध्ये बुधवारी लग्नगाठ बांधल्याची माहिती हाती आली आहे. पुण्यात अगदी निवडक आमंत्रितांच्या उपस्थितीत रिया- शिवमने त्यांच्या आयुष्याच्या या नव्या प्रवासाची सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवलेली रिया विवाहबद्ध झाल्यामुळे तिच्या ‘मेल फॅन्स’ची निराशा झाली आहे हे मात्र नक्की. रिया आणि शिवम बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शिवमसोबतचे बरेच फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे एका अर्थी हल्ली ट्रेंडमध्ये असणारे ‘कपल गोल्स’च ही जोडी देत आहे असं म्हणावं लागेल..

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress riya sen ties the knot with shivam tewari in pune
First published on: 18-08-2017 at 09:28 IST