सोनम कपूर ट्विटवर कोडं सोडवायला गेली अन् ट्रोल झाली

हे उत्तर चुकल्याचं लक्षात येताच अनेक युजर्सनी सोनमची शाळा घेण्यास सुरुवात केल्यानंतरच तिला आपण चुकलो असल्याचं लक्षात आलं.

sonam
सोनम कपूर

आपल्या रोजच्या आयुष्यातील काही भन्नाट अनुभव, गोष्टी, एखाद्या ठिकाणाला भेट दिल्याच्या आठवणी किंवा मग मनात येईल ते सर्व शेअर करण्यासाठी अनेकजण सोशल मीडियाचा वापर करतात. मुळात प्रत्येकजण या माध्यमाचा आपआपल्या परीने वापर करतं. कोणी या अनोख्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकतं, तर कोणी फक्त आणि फक्त विरंगुळा म्हणूनच या माध्यमाकडे पाहतं. सोशल मीडियावर दिवसाआड असंख्य मीम्स, जोक्स आणि तितकीच लक्षवेधी कोडी आपलं लक्ष वेधतात. खुद्द सोनम कपूरलाही अशाच एका कोड्याचं उत्तर देण्याचा मोह आवरता आलेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्रिकोणात त्रिकोण असणारं एक चित्र व्हायरल झालं असून, त्यात एकूण किती त्रिकोण दडले आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. गणित आणि निरीक्षण क्षमतेची चाचणी पाहणाऱ्या या कोड्याचं उत्तर देण्याचा अनेकांनीच प्रयत्न केला. ज्यामध्ये सोनमचाही सहभाग होता. पण, सोनमचं उत्तर चुकलं आणि इथेच संपूर्ण गणितही चुकलं, असं म्हणायला हरकत नाही.

‘फिल्मफेअर’ मासिकाचे संपादक जितेश पिल्लई यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट वरुन हा व्हायरल फोटो पोस्ट केला. ज्याचं उत्तर देत सोनमने त्या आकृतीत एकूण ७ त्रिकोण आहेत, असं लिहिलं. तिचं हे उत्तर चुकल्याचं लक्षात येताच अनेक युजर्सनी सोनमची शाळा घेण्यास सुरुवात केली. मुळात त्यानंतरच तिला आपण चुकलो असल्याचं लक्षात आलं.

नीट निरीक्षण करुन पाहिल्यास त्या एका आकृतीतील त्रिकोणांची संख्या लक्षात येत असून, एका ट्विटर युजरने सोनमला या उत्तराची उकल करुन सांगितलं आहे. तर एका युजरने मीम पोस्ट करत सोनमची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. आपल्या ट्विटवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून त्यानंतर खुद्द सोनमनेही ट्विट करत हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. मी ट्विट करताक्षणीच हे जाणून होते, की माझं उत्तर चुकलंय आणि मला अद्यापही त्या प्रश्नाचं उत्तर कळू शकेलेलं नाहीये, असं तिने ट्विट करत स्पष्ट केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actress sonam kapoor trolled for her answer to this puzzle

ताज्या बातम्या