गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रत्येकानेच आपल्या घरी बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी केल्याचं पाहायला मिळालं. वेडीवाकडी सेवा आमुची मानुनी घे गणराया असं म्हणत प्रत्येकानेच बाप्पाचरणी सेवा अर्पण केली. यामध्ये कलाकार मंडळीही मागे राहिली नाहीत. तुषार कपूर, सलमान खान या मंडळींमागोमागच अभिनेत्री सनी लिओनीनेसुद्धा तिच्या घरी बाप्पाची पूजा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गणेशोत्सवाच्याच पूजेदरम्यानचे फोटो पोस्ट केले. या फोटोंच्या माध्यमातून तिने चक्क बाप्पाच्या साक्षीने मुलगी निशासोबतच्या नात्याचाही उलगडा केला. मुलं ही देवाघरची फुलं असं म्हणतात, त्याचा जणू बी- टाऊनच्या बेबी डॉलला म्हणजेच सनीला आला आहे. त्यामागचं कारण ठरत आहे ते म्हणजे सनीने लिहिलेलं कॅप्शन.

वाचा : बाप्पा मोरया : आम्ही चालवू हा पुढे वारसा…..

निशा आपल्या कपाळावर बाप्पाचा आशीर्वादरुपी टीळा लावतानाचा फोटो पोस्ट करत सनीने लिहिलं, ‘मी देवावर विश्वास ठेवू लागले त्याचं कारण म्हणजे ही मुलगी (निशा). तिचं आमच्या आयुष्यात येणं म्हणजे एक प्रकारे देवाची आमच्यावर कृपादृष्टी होण्याप्रमाणेच आहे. निशा… आपल्यासाठी देवाकडूनच मिळालेली भेट आहे.’ सनीचं हे कॅप्शन पाहता तिच्या आणि निशाच्या नात्याची सुरेख बाजू पुन्हा एकदा सर्वासमोर आलेली आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत निशा आणि सनीच्या नात्याचं कौतुक केलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress sunny leone opens up about her daughter nisha see post ganeshotsav
First published on: 15-09-2018 at 13:53 IST