बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आनंद एल.राय यांना करोनाची लागण झाली आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. सध्या ते क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सुचनांचं पालन करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद एल. राय त्यांच्या आगामी अतरंगी रे या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होते. मात्र, या काळातच त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर ते क्वारंटाइन झाले आहेत. सोबतच त्यांनी इतरांना काळजी घेण्याचं आवाहनदेखील केलं आहे.


“माझे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. मात्र, माझ्यात करोनाची कोणतीच लक्षणं नव्हती. सध्या मी क्वारंटाइन आहे. तसंच सगळ्या नियमांचं नीट पालन करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले होते. त्यांनी कृपया क्वारंटाइन रहा आणि नियमांचं पालन करा”, अशी पोस्ट आनंद राय यांनी केली आहे.

दरम्यान, आनंद एल. राय यांच्या आगामी ‘अतरंगी रे’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष ही कलाकार मंडळी झळकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood atrangi re director aanand l rai tests positive for coronavirus ssj
First published on: 31-12-2020 at 14:55 IST