बॉलिवूड कलाकारांच्या वाट्याला प्रसिद्धी आल्यानंतर आणि त्यानंतर कलाकारांचा चेहरा ओळखीचा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांवरही अनेकांच्या नजरा असल्याचं पाहायला मिळालं आहे. कलाकारांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांची भावंड, नातेवाईक काय करतात, काय शिकतात याबद्दल जाणून घेण्यासाठीसुद्धा बरीच उत्सुकता पाहायला मिळते. त्यातही काही सेलिब्रिटींच्या कुटुंबियांबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. यापैकीच एक सेलिब्रिटी म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून पदार्पण करणारी दीपिका सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत अग्रगणी आहे. चित्रपट विश्वासोबतच ही ‘मस्तानी’ सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे.

काही दिवसांपूर्वीच तिने बहिणीसोबतचा एक सुरेख फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आणि सर्वांनीच तिच्या बहिणीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली. अनिशा सोबतचा दीपिकाचा हा फोटो अनेकांचीच मनं जिंकून गेला. अनिशा आणि दीपिका यांच्या नात्याची झलक याआधीही काही व्हिडिओ आणि फोटोंमधून पाहायला मिळाली आहे. अनिशा दीपिकापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. कलाविश्वापासून दूर असलेल्या दीपिकाच्या या धाकट्या बहिणीने कुटुंबातील क्रीडा विश्वाचा वारसा पुढे नेला आहे. ती प्रोफेशनल गोल्फ खेळाडू आहे.

https://www.instagram.com/p/BV-L1ULBFps/

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

13-1468410004-deepika-padukone-rare-pictures-with-sister-anisha-padukone-7

651

दीपिकासोबत तिने बऱ्याच कार्यक्रमांनाही हजेरी लावली होती. खेळाकडे फारसा कल असल्याचंही तिने बऱ्याचदा स्पष्ट केलं आहे. सायना नेहवाल तिची आवडती खेळाडू आहे. गोल्फ व्यतिरिक्त तिला क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि बॅडमिंटन या खेळांमध्येही रस आहे. पण, गोल्फकडे तिचा जास्त कल होता. वयाच्या १२ व्या वर्षांपासून तिने गोल्फ खेळण्यास सुरुवात केली होती. सहसा चित्रपट जगतापासून दूर राहणारी अनिशा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. ट्विटरवर तिचे ५० हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर, इन्स्टाग्रामवरही तिचे बरेच फॉलोअर्स आहेत.

deepika-padukone-kid1