अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी विविध मार्गांचा वापर करताना दिसत आहे. बँक चोर या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रितेशने नवीन शक्कलही लढवल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘चोरी का इंटरव्ह्यू’ हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर रितेशने आणखी एक शक्कल लढवली आहे. पण, यामुळे त्याच्यावर बी- टाऊनचा एक मोठा सेलिब्रिटी नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शाहरुखच्या आगामी चित्रपटाच्या म्हणजेच ‘जब हॅरी मेट सेजल’च्या पोस्टरची मदत घेत रितेशने त्याचं आणखी एक स्पूफ तयार केलं आहे. त्या स्पूफमध्ये शाहरुख आणि अनुष्काऐवजी रितेश आणि विवेकचा चेहरा पाहायला मिळत आहे. पण, त्याचं हे स्पूफ शाहरुखला काही आवडलं नाहीये हेच स्पष्ट होत आहे. रितेशने ट्विट केलेलं हे स्पूफ पाहता त्यावर शाहरुखने काही गंभीर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे किंग खानला हे सर्व आवडलं नसल्याचंच स्पष्ट होतंय.

रितेशने फक्त शाहरुखच्याच नव्हे तर इतरही काही चित्रपटांच्या पोस्टरचे स्पूफ केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या या स्पूफपासून ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘बाहुबली २’, ‘काबिल’ हे चित्रपटही वाचू शकले नाहीयेत. या स्पूफमध्ये मुख्य म्हणजे काही चित्रपटांच्या पोस्टरला विनोदी टच देत मूळ कलाकारांचे चेहरे काढून त्याऐवजी रितेशने स्वत:चा चेहरा लावला आहे. त्यासोबतच या रिक्रिएटेड पोस्टरमध्ये त्याने चित्रपटाच्या टॅगलाइनही बदलल्या आहेत.

पोरगी पास होण्याचं सुख काय असतं ते भाऊ कदमला विचारा

विनोदी भूमिकांसाठी ओळखला जाणारा रितेश या चित्रपटातून आपल्या दोन सहकऱ्यांसोबत ‘बँक चोर’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटात तो ‘चंपक चंद्रगुप्त चिपळूणकर’ ही भूमिका साकारणार आहे. बंपी दिग्दर्शित ‘बँक चोर’ चित्रपटाची निर्मिती यश राज बॅनरचे यूथ प्रॉडक्शन हाऊस ‘व्हाय- फिल्म्स’ने केली आहे. ‘व्हाय- फिल्म्स’ने या आधी ‘मॅन्स वर्ल्ड’, ‘बँग बाजा बारात’ आणि ‘लेडीज रूम’ यांसारख्या वेब सीरिजची निर्मिती केली होती.