करण जोहरने नुकतीच त्याच्या आगामी ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला आणली. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून करणने आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन या नव्या चेहऱ्यांना कलाविश्वात पदार्पण करण्याची संधी दिली होती. तर याच चित्रपटाच्या सिक्वलमधून म्हणजेच ‘स्टुडंट ऑफ द इयर २’मधून तो तारा सुतारिया, अनन्या पांडे आणि टायगर श्रॉफ या कलाकारांना प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. पण, नेटकऱ्यांना मात्र त्याच्या या आगामी चित्रपटाची स्टारकास्ट खटकली आहे असंच दिसतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करणने सोशल मीडियावरुन त्याच्या आगामी चित्रपटातील चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आणि त्याच्यावर पुन्हा एकदा घराणेशाहीची टीका करण्यात आली. साधारण वर्षभरावूपर्वीसुद्धा करणवर याच मुद्द्यावरुन टीका करण्यात आली होती. किंबहुना घराणेशाहीचा प्रणेता म्हणूनही त्याचा अनेकजण उल्लेख करतात. याचीच पुनरावृत्ती झाल्याचं सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

पुन्हा एकदा स्टारकिड्सच्याच मुलांना आपल्या चित्रपटासत संधी देणाऱ्या करणवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला असून, ट्विट करत त्याला उद्देशून उपरोधिक टीका केल्याचंही पाहायला मिळालं. या सेलिब्रिटी किड्सपेक्षाही चांगले कलाकार आज कामाच्या शोधात आहेत, त्यांना संधी दे असं म्हणत एका युजरने करणला महत्त्वाचा सल्ला दिला. तर कोणी नेपोटिझम का बाप, असं म्हणत त्याच्यावरील नाराजी व्यक्त केली. नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रिया पाहून आता केजो त्याला काही उत्तर देतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याशिवाय हा घराणेशाहीचा मुद्दा आणखी किती दिवस चाळवला जाणार हेसुद्धा येता काळच ठरवणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood movie student of the year cast revealed by producer director karan johar twitterati scream nepotism
First published on: 12-04-2018 at 11:30 IST